Home » माझा बीड जिल्हा » झुंजार नारी मंचच्या हस्तकला शिबीरास प्रतिसाद.

झुंजार नारी मंचच्या हस्तकला शिबीरास प्रतिसाद.

झुंजार नारी मंचच्या हस्तकला शिबीरास प्रतिसाद.

 अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन

पाटोदा — येथे झुंजार नारी मंचाच्या वतीने एक दिवशीय हस्तकला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरासाठी बीड येथील मिनाक्षी शेटे यांनी महीलांना वेगवेगळ्या सुदंर हस्तकला सादर केल्या व विविध वस्तुपासुन सुंदर शोपीस तयार करुन दाखवले या कार्यक्रमाला पाटोदा येथील महीलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन झुंजार नारी मंचाच्या पाटोदा तालुका शाखेने होते.झुंजार नारी मंचाच्या व पाटोदा येथील महीला ही या शिबीरासाठी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने झाली. झुंजार नारी मंचाच्या सदस्यां सत्यभामा ताई बांगर व सौ. अनिताताई हुले यांनी प्रशिक्षक मिनाक्षी शेटे व ज्योती नाईक यांचे स्वागत केले. सुत्रसंचलन सौ. राधाताई देशमुख यांनी केले. तर पाहुण्यांचा परीचय व प्रास्ताविक सौ. संध्याताई टेकाळे यांनी केले. या कार्यक्रमाला झुंजार नारी मंचाच्या सदस्यां सौ. सत्यभामा ताई बांगर, सौ. अनिताताई हुले, सौ.गंगा देशमुख, सौ.विद्या देशमुख, सौ.मिनाताई हुले, सौ. सुरेखा पांडव, सौ.रुपाली हुले, सौ.भोसले,सौ. विद्या काथवटे, सौ. अनिताताई हुंबे, सौ.मस्के, सौ.बालिका वाघमारे सौ.ललिता वराट, सौ.मनिषा ढेरे. सौ.भालेकर, सौ. शितल धसे, सौ. सुरेखा देशपांडे, सौ. सविता जावळे, सौ. कीर्ती दिक्षीत, सौ.विजयाताई जायभाये. सौ.रत्नाताई बांगर इ. महीला उपस्थित होत्या. कार्यक्रमात विविध सुंदर हस्तकलेचे सादरीकरण शेटे मॅडम यांनी केले व महीलांना प्रेरणादायी असा उपक्रमांची माहीती दीली. तसेच या कार्यक्रमात झुजांर नारी मंचाच्र्या नविन सदस्यांना रिटर्न गिफ्ट देऊन त्याचे झुंजार नारी मंचामध्ये स्वागत करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महीलांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.