Home » महाराष्ट्र माझा » रस्ते अपघातांत पाच वर्षांत १४९९ जणांचा मृत्यू.

रस्ते अपघातांत पाच वर्षांत १४९९ जणांचा मृत्यू.

रस्ते अपघातांत पाच वर्षांत १४९९ जणांचा मृत्यू.
डोंगरचा राजा /आँनलाईन
अलिबाग – रायगड जिल्ह्यत रस्ते अपघातात गेल्या पाच वषार्ंत १४९९ जणांचा मृत्यू झाला. अपघातांचे तर या वर्षी चार महिन्यांत ३५० अपघातांची नोंद झाली असून ९० जणांचां बळी गेला आहे. अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, वाढलेली अवजड वाहतुक, आणि बेदरकार वाहन चालक ही या अपघातांमागची प्रमुख कारणे ठरली आहेत.

रायगड जिल्ह्यातून मुंबई- गोवा महामार्ग, मुंबई- पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबइर्- पुणे महामार्ग असे तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. यातील मुंबई- गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर अपघातात आजवर हजारो लोकांनी जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभिररीत्या जखमी झाले आहेत.

आकडेवारीचा विचार केला तर २०१३ मध्ये जिल्ह्यत १ हजार २७९ अपघातांची नोंद झाली. यात २८८ जणांचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये १ हजार २६२ अपघात झाले. यात २५५ जणांचा बळी गेला. २०१५ मध्ये १ हजार ४२३ अपघातांची नोंद झाली, ज्यात ३५७ जण मृत्यूमुखी पडले. २०१६ मध्ये झालेल्या १ हजार १५१ अपघातात ३०१ जणांचा मृत्यू झाला, तर २०१७ मध्ये १ हजार १० अपघातात २२४ जण मृत्यूमुखी पडले, म्हणजेच गेल्या पाच वषार्ंत जिल्ह्यात रस्ते अपघातात १ हजार ४९९ जणांचा बळी गेला. ही एक चिंतेची बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.