Home » माझी वडवणी » भर उन्हाळ्यात वडवणीच्या नदीला पाणी.

भर उन्हाळ्यात वडवणीच्या नदीला पाणी.

भर उन्हाळ्यात वडवणीच्या नदीला पाणी.
डोंगरचा राजा/आँनलाईन
– जांभळी चा तलाव तुडुंब भरला.
– नदी ही दुथडी वाहु लागली.

वडवणी शहरासह तालुक्यातील गावा- गावात नागरिक फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईच्या झळा सोसतांना दिसतात.पिण्याच्या पाण्यासह शेती, उद्योग ,व्यवसायासाठी पाणी हे आवश्यक बाब आहे. वडवणी नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा सौ.मंगलताई राजाभाऊ मुंडे यांनी अतिशय छान आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविला आहे.उर्ध्व कुंडलीका प्रकल्पाचे पाणी जांभळी तलावातुन नदी पात्रात ओसोडुंन वाहु लागले. अचानक आलेल्या पाण्याने सर्व नागरिकांना आनंदी तर केलेच माता भगिनीही दुसऱ्यांदा दसरा काढु लागल्या आहेत.उन्हाळ्यात नदीला पाणी आल्याने निश्चितच वडवणीकरांची तहान भागली आहे.

वडवणी तालुका म्हटलं की अर्धा भाग डोंगराळ आणी अर्धा गंगथडीचा या दोन्ही भागातील शेतकरी , सामान्य नागरिक यांचा प्रमुख व्यवसाय म्हटलं तर उस उत्पादक आणि उसतोड मजुर अशी दुतर्फा ओळख असलेला हा तालुका आहे. याला सुजलाम,
सुफलाम करण्यासाठी निश्चितच माजी मंत्री प्रकाश सोळंके आणि माजी आमदार केशवराव आंधळे यांचा सिंहाचा वाटा आहे. उर्ध्व कुंडलीका प्रकल्पाचे पाण्याने तालुक्यात सर्वत्र नंदनवन केले आहे. आज डोंगराळ भाग पुर्णत: बागायती झाला.हेच ओसाड पडलेले डोंगर आज हिरवाईने नटलेले दिसत आहेत. या प्रकल्पाचे पाणी पाईपलाईन व्दारे सर्वत्र मिळावे म्हणून मोठमोठया पाईपलाईन चे कामे युध्द पातळीवर सुरु आहेत. सध्या वडवणी शहर आणि तालुक्यात भयाण तापमान वाढले आहे.दिवसभर बालगोपाल तर सोडाच जेष्ठ नागरिक आणि माता भगिनी कितीही काम असले तरी घराबाहेर पडत नाहीत.ऐवढे तापमान वाढले आहे.वडवणी येथील रेणुका माता मंदीराजवळ असलेला जांभळी चा तलाव कोरडा ठाक होता तो अचानक भरला कसा हे पाहण्यासाठी तलावाकाठी एकच गर्दी होऊ लागली.भर उन्हाळ्यात हे द्रश्य पाहुन कोणालाही पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मनमुरादपणे पोहण्याचा आनंद घेतांना तरुणाई दिसत आहे.तलाव भरला ठिक आहे मात्र त्याच रात्री २ वाजण्याच्या सुमारास या तलाव पायथ्याशी असलेली नदी तुडुंब भरुन वाहु लागली नदी काठी असलेली शेकडो घरे पाण्याच्या आवाजाने जागी झाली.आनंदाने चर्चा ही करु लागली पाऊस तर झालाच नाही नदीला पाणी आलेच कसे हा प्रश्न अगदी सकाळच्या प्रहरी प्रत्येक जण जो भेटला त्यास विचारु लागला. शहरात दोन दिवसापासून तलाव व नदीला आलेल्या पाण्याची चर्चा रंगली. ही किमया नगरपंचायत ची आहे भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे कधी काय करतील याचा नेम नाही जे काही करतील त्या कामाची चर्चा मात्र होतेच हे देखील सत्य आहे.कारण तलावाला व नदीला पाणी सोडण्याचे नियोजन झाले. शहराला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही मामला धरणातुन केलेली आहे.या तलावात मुबलक पाणी साठा राहावा व शहरातील नागरिकांना पाणी टंचाई भासु नये म्हणून कोणालाही कांही खबर नसताना स्वतः नगरपंचायत निवडणुकीत गुरफटलेले असताना देखील ही कधी कोणाच्या डोक्यात न येणारी बाब प्रत्यक्षात राबवुन आपल्या एका अनोख्या कामाचा ठसा उमटावला आहे. नदीला पाणी आले हा..हा म्हणता शहरात सर्वत्र चर्चा झाली माता भगीनीही नदीकडे धावल्या पाणी पाहुन आनंदी झाल्या.दिवाळी पुर्वीचा दसरा जसा काढतो अगदी तसाच दसरा भर उन्हाळ्यात नदीला आलेल्या पाण्यात काढला जात आहे.बच्चे कंपनी देखील नदीकाठी वाहत्या पाण्याचा आनंद घेतांना दिसुन येत आहे.याचे श्रेय जाते ते नगरपंचायत ला आणि विशेषतः भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे यांनाच..

Leave a Reply

Your email address will not be published.