Home » माझा बीड जिल्हा » पाटोद्याच्या नगरअध्यक्षपदी सौ.अनिता नारायनकर.

पाटोद्याच्या नगरअध्यक्षपदी सौ.अनिता नारायनकर.

पाटोद्याच्या नगरअध्यक्षपदी सौ.अनिता नारायनकर.
अमोल जोशी /डोंगरचा राजा आँनलाईन.

पाटोदा आज अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे आज पाटोदा नगरपंचायत कार्यालय येथे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम निवडणूक पीठासन् अधिकारी गणेश निराली यांच्या उपस्तिथित पार पडला यावेळी दोन्ही पदासाठी एक एकच अर्ज आल्याने ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली नगरपंचयत अध्यक्ष पद हे पुढील अडीच वर्षासाठी अ जा जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव पडले होते या पदासाठी या प्रवर्गातून एकमेव निवडून आलेल्या सौ अनीता गणेश नारायनकर यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सय्यद जरीना अब्दुल्ला यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली या पाटोदा नागरपंचायत मधे माजी मंत्री सुरेश धस यांची निर्विवाद सत्ता आहे आज सकाळी माजी मंत्री सुरेश धस यांनी पाटोदा नगरपंचायत च्या सर्व नगरसेवकांची आष्टी येथे बैठक घेऊन उपनगरअध्यक्ष पदाची माळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सय्यद अब्बुशेट यांच्या पत्नी सय्यद जरीना अब्दुल्ला यांच्या गळ्यात टाकली आज निवड केलेले नगराध्यक्ष व् उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकटावर निवडून आलेले आहेत मात्र आता हे सर्वच सुरेश धस यांच्या समवेत भाजपात आलेले आहेत आजच्या या बैठकीस नगरपंचायत च्या मावळत्या नगराध्यक्ष सौ मनीषा पोटे नगरसेवक विजय जोशी बालाजी जाधव संदीप जाधव आसिफ सौदागर राजू जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्तिथ होते.
माहितीसत्व पाटोदा नागरपचयत बलाबल राष्टवादी 10 भाजप 3 कांग्रेस 1 अपक्ष 3 स्वीक्रत सदस्य 2 राष्टवादी हे सर्वच सुरेश धस यांच्या समवेत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.