Home » देश-विदेश » हेरगिरी करणाऱ्या ; आचाऱ्याला अटक.

हेरगिरी करणाऱ्या ; आचाऱ्याला अटक.

राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी हेरगिरी; आचाऱ्याला अटक.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– रमेश हा पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी सुमारे दोन वर्षे आचाऱ्याचे काम करत होता. त्याने पैशांच्या मोबदल्यात आयएसआयला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी हेरगिरी; आचाऱ्याला अटक
पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या एका आचाऱ्याला आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या एजंट असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. रमेश सिंह (वय ३५) असे अटक केलेल्या आचाऱ्याचे नाव असून त्याला पिथौरागड येथून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. रमेश हा पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी सुमारे दोन वर्षे आचाऱ्याचे काम करत होता. त्याने पैशांच्या मोबदल्यात आयएसआयला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने रमेशला पिथौरागडमधील गराली गावातील त्याच्या घरातून अटक केली. पोलिसांच्या मते, पाकिस्तानमध्ये भारतीय संरक्षण विभागाशी संबंधित एका राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी रमेशने मायक्रोफोन लावून हेरगिरी केली आणि आयएसआयला अनेक गोपनीय माहितींची देवाणघेवाण केली. रमेशचा मोठा भाऊ हा भारतीय लष्करात कार्यरत आहे.

रमेशसिंहला पिथौरागड न्यायालयात सादर केले असताना त्याला ट्रान्जिस्ट रिमांडवर लखनऊला पाठवण्यात आले. उत्तर प्रदेश एटीएसचे महासंचालक असीम अरूण म्हणाले की, उत्तराखंडच्या पोलीस महासंचालकांनी काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांना मदत मागितली होती. लष्करी गुप्तचर यंत्रणांनाही मदत मागण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश सिंह ज्यावेळी शेती करत होता. त्यावेळी त्याच्या एका नातेवाईकाने त्याला पाकिस्तानमध्ये आचाऱीच्या नोकरीचा प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानमध्ये तो मे २०१५ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान एका भारतीय संरक्षण राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी काम करत होता. याचदरम्यान तो आयएसआयच्या संपर्कात आला. रमेश सिंहने आयएसआयला एक डायरी आणि काही गोपनीय दस्तऐवज पुरवल्याचे सांगण्यात येते.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणाले की, रमेश सिंहने आयएसआयची साथ देत एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी हेरगिरी केली. तो २०१७ मध्ये भारतात परतला. इथे परतल्यानंतर त्याने आपले आठ लाखांचे कर्ज फेडले. आयएसआयने त्याला किती पैसे दिले हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.