Home » माझा बीड जिल्हा » स्पर्धेच्या समारोप दिनी हजारोंनी केले श्रमदान. 

स्पर्धेच्या समारोप दिनी हजारोंनी केले श्रमदान. 

स्पर्धेच्या समारोप दिनी हजारोंनी केले श्रमदान. 

 संतोष स्वामी / डोंगरचा राजा.

गेली दिड महिना सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेच्या माध्यमातुन लोकहिताची चळवळ धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी येथे सुरु होती. येथिल सरपंच ललिता रामकिशन व्हरकटे यांनी सारा गाव एकत्र आणत दुष्काळग्रस्त व्हरकटवाडीत मशिन व श्रमदानाने 1 लाख घनमिटर काम पाणि आडवुन जिरवण्या साठी केले आहेत.वाॅटरकप स्पर्धेच्या नियमानुसार माथा ते पायथा दर्जेदार केलेल्या या कामामुळे येत्या पावसाळ्यात गाव पाणिदार होणार आहे.
पंचेचाळीस दिवसात सात शेत तळे,17 मातीनाला बांध, पंधराशे डोंगरमाळ बनवत मशिन व लोक श्रमदानातुन एक लाख एक हजार पाचशे घनमिटर काम पाणि संचयासाठी व्हरकटवाडी ग्रामस्थांनी केले आहे.या कामात अबालवृध्दांनी सहभाग नोंदवत कष्ट घेतली आहेत.
वाॅटर कप स्पर्धेच्या शेवटच्या दिवसी वन अधिकारी अमोल सातपुते व त्यांचे धारुर तालुक्यातील कर्मचारी तसेच आय टी आय काॅलेज बीड चे 110 विद्यार्थी यांनी श्रमदान केले.विद्यार्थ्यांनी सकाळी 8 वाजता गाव झाडत स्वच्छ केले. पंचेचाळीस दिवस चाललेल्या शेवटच्या दिवसी या गावच्या नातेवाईकांनी भेट देत श्रमदान केले.
या गावातील लोकसहभागातुन झालेल्या कामात येथिल युवकांचा खारिचा वाटा असुन सकाळी आठ वाजल्या पासुन रात्री 12 वाजेपर्यंत हि तरुण मंडळी व्हरकटवाडीच्या दुष्काळावर मात करणार्या लढ्यात सहभागी होत अतिशय शिस्तबध्द व सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेच्या नियमानुसार काम करित आहेत.वाॅटर कप स्पर्धेतील मोठे बक्षीस मिळवण्याच्या ध्यासाने ग्रासलेली हि मंडळी येत्या पावसाळ्यानंतर सुजलाम सुफलाम पाणिदार व्हरकटवाडी बघणार आहेत हे मात्र निश्चित आहे.

*पक्षांना पाणी पिण्यासाठी कुंड्या*

आयटीआय काॅलेज बीड चे शिक्षक शिंदे यांनी व्हरकटवाडी परिसरातील डोंगरावर पक्ष्यांसाठी
दहा हजार कुंड्या बनवल्या असुन वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या हस्ते कुंडी झाडाला बांधत आदर्श उपक्रम राबवला आहे.

*घुबडाला जिवदान*

उन्हाचा पारा चढतांना पशुपक्षांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरु असते.असेच भरकटलेले एक घुबड संदिपान व्हरकटे यांच्या विहीरीत पडले.श्रमदान करणार्या ग्रामस्थांनी फांदिच्या सहाय्याने त्याला बाहेर काडुन जिवदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.