Home » राजकारण » भुजबळांचा ‘राष्ट्रवादी’ला पहिला धक्का?

भुजबळांचा ‘राष्ट्रवादी’ला पहिला धक्का?

भुजबळांचा ‘राष्ट्रवादी’ला पहिला धक्का?
डोंगरचा राजा / आँनलाईन
– शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना दिले बळ.
– भुजबळ पुत्राने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट.
– दराडे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
भुजबळांचा ‘राष्ट्रवादी’ला पहिला धक्का? शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना दिले बळ
अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांची पुरेशी पाठराखण केली नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक मतदार संघाच्या निवडणुकीत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. या विजयात छगन भुजबळांनीही हातभार लावला, अशी सूचत प्रतिक्रिया शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांच्या पुत्राने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे दराडे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, मनसे अशी महायुती असतानाही दराडे यांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर दराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली. ‘शिवसेनेकडे २११ मतेच होती. तर विजयासाठी ४०० मतांची गरज होती. पण सर्वच पक्षातील नेतेमंडळी माझ्या मदतीला धावून आली. छगन भुजबळांनीही माझ्या विजयात हातभार लावला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोन वर्ष तुरुंगात काढल्यानंतर छगन भुजबळ नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. अडचणीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची पुरेशी पाठराखण केली नाही व त्यामुळे आगामी काळात ते वेगळ्या पर्यायाचा विचार करु शकतात, अशी चर्चा आहे. भुजबळांना जामीन मिळताच ९ मे रोजी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली होती. तर शिवसेनेच्या मुखपत्रातूनही भुजबळांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.