Home » माझा बीड जिल्हा » मोर्चाच्या तयारी साठी रिपाई ची बैठक.

मोर्चाच्या तयारी साठी रिपाई ची बैठक.

मोर्चाच्या तयारी साठी रिपाई ची बैठक.
बीड / डोंगरचा राजा आँनलाईन
– रिपाई युवा प्रदेश अध्यक्ष कागदेंनी केले मार्गदर्शन .

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व क्रियाशील कार्यकर्ते/पदाधिका-यांची
जिल्हा स्तरीय बैठक नुकतीच पार पडली .बैठकीत ,कोरेगाव-भीमा येथील दंगलीचा मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यास तातडीने अटक करण्यात यावी, अट्रॉसिटी कायदा अधिक तीव्र व सक्षम करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, गायरान जमिनी नावे करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात,ग्रामसभा/ग्रामपंचायत च्या घरकुला ला ठराव देण्याची अट रद्द करण्यात येऊन सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, शहरी भागातील गोर-गरिबांना विना अट घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, विद्यार्थ्यांच्या शिष्यवर्ती मध्ये वाढ करण्यात येऊन ती विना विलंब विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, मागासवर्गीयांच्या सर्वच महामंडळास विना विलंब निधी उपलब्ध करून द्यावा तसेच प्रलंबित सर्व कर्ज प्रकरणे निकाली काढून लाभार्थ्यांना त्याचे लवकर वाटप करावे आदी मागण्यासाठी येत्या जून महिन्यात बीड येथे काढण्यात येणाऱ्या”विराट मोर्च्याच्या”तयारी साठी व पुणे येथे दि.27/05/18 रोजी पक्षाच्या वतीने आयोजित अधिवेशनाच्या पूर्व तयारी साठी रिपाईच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे असे आवाहन रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published.