Home » क्राईम स्टोरी » मुलीची २४ तासात सुटका, आरोपी जेरबंद.

मुलीची २४ तासात सुटका, आरोपी जेरबंद.

मुलीची २४ तासात सुटका, आरोपी जेरबंद.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– बीड ग्रामीण पोलिसांची कामगिरी..

बीड — मित्राच्या १३ वर्षीय बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणास बीड ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आतमध्ये जेरबंद केले असून मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या हवाली केले आहे.

बीड ग्रामीण ठाण्यात दि. २० मे रोजी एक १३ वर्षाच्या ८ वीत शिकणाऱ्या मुलीला एका १८ वर्ष वयाच्या तरुणाने पळवून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. मुलीच्या भावाशी असलेल्या मैत्री मधून त्याचे सतत घरी येणे जाणे असायचे. याचाच गैरफायदा घेऊन भावाबरोबरच्या मैत्रीच्या आडून त्याने तिच्याशी सलगी वाढवली. सदरील मुलगी रविवारी आजोळी गेली असता तिला तेथूनच पळवून घेऊन गेला आणि पोलीस ठाणे बीड ग्रामीण येथे तक्रार दाखल झाली. मुलीबरोबर हा मुलगाही गायब असल्याने भावाच्या मित्रवबाबत संशय निर्माण झाला होता. त्यावरून पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यामाध्यमातून माहिती घेण्यास सुरवात केली. आणि गुन्हा दाखल झाल्या पासून २४ तासाच्या आत मुलगी मुलासह शोधण्यास यश मिळाले आहे. मुलाला ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरु आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक, वैभव कलुबरमे, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनखाली सपोनि शीतलकुमार बल्लाळ, पोहेका हनुमान इंगळे, रमेश दूबाले, जयसिंग वाघ, नाईक पो कॉ अमोल येळे, दिनेश ढाकणे यांनी कामगिरी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.