Home » महाराष्ट्र माझा » धनगर विधानसभेत घुसणार.. -अँड.आंबेडकर

धनगर विधानसभेत घुसणार.. -अँड.आंबेडकर

धनगर विधानसभेत घुसणार.. -अँड.आंबेडकर

– पंढरपूर येथील सभेतून…

पंढरपूर / डोंगरचा राजा आँनलाईन
केवळ अभूतपूर्व… आणि अभूतपूर्वच म्हणावे लागेल ! अपेक्षा पेक्षाही अभूतपूर्व धनगर समाजाचा सत्ता संपादन निर्धार महामेळावा लाखोंच्या संख्येने अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी त्यांनी आता देव धनगरवाड्यात नव्हे तर धनगर विधानसभेत घुसणार.. असे मत व्यक्त केले.

यावेळी महामेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित जनसागरला मार्गदर्शन केले. अँड.आंबेडकर म्हणाले, ‘ महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्या घरण्याची गेली 70 वर्षे सत्ता आहे.या घराण्यांनी अलुतेदार बलुतेदारांचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. प्रस्तापितांनी आमचे मते लाटली पण गेल्या 70 वर्षांपासून आमचे प्रश्न सतत रेंगाळत ठेवले आहेत. आता धनगर समाजाने मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेतला पाहिजे आणि आपल्या सोबत संख्येने कमी असलेल्या अलुतेदार बलुतेदार यांना घेऊन सत्तेच्या चावी आपल्या हातात घेतली पाहिजे.

पुढे बोलताना ते म्हणाले,’सत्ता संपादनाचा निर्धार करत असताना माझ्या पेक्षा मोठा कोण आहे ? किंवा माझ्या पेक्षा लहान कोण आहे ? हि भावना न ठेवता आपण सर्वांना बरोबरीची वागणूक दिली पाहिजे. आपला मित्र कोण आहे ?हे ओळखले पाहिजे. आपण ज्यांना सत्तेत सोबत घेणार आहोत त्यांच्यात परस्पर विश्वास निर्माण केला पाहिजे. माझी मते माझ्याच मित्राला पडतील,आपण जो निर्धाराचा लढा उभारला आहे त्या लढ्यातील सहकाऱ्यांनाच माझे मते पडतील.सत्ता संपादनाच्या लढ्याच्या विरोधात माझ्या जातीचा नव्हे माझा सख्खा नातेवाईक जरी उभा राहिला तरी सुध्दा मी त्याला मतं देणार नाही अशी शपथच आपण घेतली पाहिजे तेंव्हाच आपण सत्तेत बसू शकतो.

आजी माजी सत्ताधाऱ्यांवर घाणाघात चढवतांना अँड.आंबेडकर बाणेदारपणे आपला एल्गार पुकारताना दहाडले,’गेल्या सत्तर वर्षांपासून आम्हाला ज्यांनी नडवले त्या प्रस्थापितांना मी गाडायला निघालो आहे !’ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य कोड करून त्यांनी सांगितले,’बाबासाहेब म्हणाले होते की,’सर्व प्रश्नांची गुरूकिल्ली हि राजसत्ता आहे. ती सत्ता आपल्या ताब्यात घ्या. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हालाच सोडवता येतील’.

या लढ्याला मुर्त स्वरूप देण्यासाठी धनगर समाजाने गावात गेल्यावर आपले अलुतेदार बलुतेदार मित्र शोधून त्यांच्या सोबत बैठका घेतल्या पाहिजेत. येणाऱ्या 2019 व त्यापुढील निवडणूकीत धनगर समाजाचे खासदार,आमदार मोठ्या प्रमाणात निवडून गेले पाहिजेत व सोबतच आदिवासी समाजाचे सुध्दा खासदार, आमदार निवडून पाठविण्याची जबाबदारी धनगर समाजाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

धनगर समाजाचा पहिल्यांदाच संपन्न झालेला हा सत्ता संपादन निर्धार महामेळावा अनेक बाबींनी वैशिष्ट्ये पूर्ण होता.मेळाव्यात तरूणांची प्रचंड संख्या होती त्याचबरोबरीने समाजाला मार्गदर्शन, दिशा देणारे अनेक गणमान्य व्यक्तींची लक्षणीय उपस्थिती होती. अँड .आंबेडकरांचे स्वागत, त्यांच्या भाषणाला तरूणाईने भरभरून दाद दिली. प्रचंड टाळ्या,गगनभेदी जयजयकाराच्या घोषणांनी तरूणांनी आसमांत दुमदुमून सोडला.एकंदरीतच महामेळावा अभूतपूर्व संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.