Home » ब्रेकिंग न्यूज » ललिता होणार आता ललितकुमार.

ललिता होणार आता ललितकुमार.

ललिता होणार आता ललितकुमार.
डोंगरचा राजा / आँनलाईन.

माजलगाव येथील शहर पोलिस ठाण्याची महिला पोलिस ललिता साळवे हिला लिंगबदल करण्याच्या आपल्या प्रदिर्घ संघर्षा नंतर लिंगबदल शस्ञक्रियेसाठी परवानगी दिली आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशा नुसार जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांनी ललिता साळवे हिला लिंगबद्दल करण्याच्या परवानगीचे पञ दिले आहे. पोलिस महासंचालकांच्या या आदेशामुळे ललिता साळवेचा लिंगबद्दल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ललिता साळवे आत्ता ललितकुमार होणार आहे.

माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील व बीड पोलिस दलात कार्यरत असलेल्‍या महिला पोलिस ललिता साळवेला गेल्या अनेक वर्षांपासून शरिरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने पोलिस खात्याकडे परवानगी मागितली होती. माञ, ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यास पुरुष झाल्याने तिच्या नोकरीवर गदा येण्याची शक्‍यता होती. त्‍यामुळे ललिता साळवेने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. अब्बास नक्वी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.

शरिरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार आसल्याने न्यायालयाने तिच्या लिंगबदलाला परवानगी दिली होती. माञ, गृहविभागात ही पहिलीच बाब आसल्याने तांञिक अडचणी निर्माण झाल्या होत्‍या. ललिताच्या या मागणीमुळे पोलिस खात्यापुढे पेच निर्मान झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आसल्याने या बाबत सहानभुती पुर्वक विचार केला जाईल असे म्‍हटले होते.

गृह विभागाने मागिल महिन्यापूर्वी तामिळनाडु राज्यातील एका तृतिय पंथीयाबाबतीत घेतलेल्‍या निर्णयाच्या आधारे ललिता साळवेला दिलासा देणारा निर्णय घेतला. या सर्व घडामोडीनंतर महासंचालक सतिष माथुर यांनी गृहविभागाचा हा आदेश बीड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांना दिला.

दरम्‍यान, लिंगबलाच्या या निर्णयानंतर ललिता साळवे आपल्या लिंगबदल शस्ञक्रियेसाठी तात्काळ मुंबईला रवाना झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.