Home » ब्रेकिंग न्यूज » मनीषा वाघमारे एव्हरेस्ट शिखरावर.

मनीषा वाघमारे एव्हरेस्ट शिखरावर.

मनीषा वाघमारे एव्हरेस्ट शिखरावर.

डोंगरचा राजा / औरंगाबाद

औरंगाबादची गिर्यारोहक मनीषा वाघमारेने सोमवारी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. सागरमाथ्यावर पाऊल ठेवणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच महिला गिर्यारोहक ठरली आहे.

गतवर्षी मनीषा वाघमारेला खराब हवामानामुळे अवघ्या १७० मीटर अंतरावरून माघारी परतावे लागले होते. यंदा नव्या जोमाने मनीषा एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर गेली होती. १७ मे रोजी मध्यरात्री मनीषाने बेसकँपवरून एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने चढाईस सुरवात केली. निर्धारित नियोजनाप्रमाणे ती चढाई करीत होती. रविवारी मध्यरात्री मनीषाने कँप चारवरून एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यास प्रारंभ केला. सोमवारी सकाळी ८.१० वाजता मनीषाने सागरमाथ्यावर पाऊल ठेवले. शेर्पा दावा चिरिंगची तिला खूप मदत झाली.
मूळची परभणी येथील मनीषा वाघमारे ही औरंगाबादेतील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख कार्यरत आहे. क्रीडा विभाग प्रमुख असताना एव्हरेस्ट शिखर मोहिम फत्ते करणारी ती पहिलीच क्रीडा विभाग प्रमुख ठरली आहे. राज्य शासनाने मनीषा वाघमारेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.