प्राणीमित्रामुळे वाचले घुबडाचे प्राण.
अमोल जोशी / डोंगरचा राजा.
पाटोदा शहरातील नवीन स्टॅन्ड परिसरात प्राणी मित्र अनिल जावळे व त्यांचे मित्र हॉटेलवर चहा पित बसले असता तहानेने व्याकुळ झालेले घुबड बसस्टॅंड जवळील हॉटेल समोर अचानक येऊन पडले शंभर एक कावळ्यांनी त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करीत होते ,अनिल जावळे यांनी पळतच जाऊन घुबडाला तात्काळ कावळ्याच्या हल्ल्यातुन मुक्त करीत घुबडाला घरी घेऊन गेले व त्यास आवश्यक ते खाऊ पिऊ घातले व किरकोळ जखमांवर उपचार करीत रात्रभर घरात त्यास सहारा देत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अनिल जावळे यांनी घुबडास घरावरील गच्चीवर नेले आणि मुक्त केले
पाच मिनिटं शांत बसल्यानंतर घुबडाने गगन भरारी घेतली आणि अनिल च्या चेहऱ्यावर घुबडाचा जीव वाचविल्याचा आनंद ओसंडून वाहू लागला.हे घुबड दुर्मिळ जातीचे असून इंडियन बफी फिश उल या जातीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल जावळे हे प्राणी मित्र असून सर्प मित्र आहेत आजवर त्यांनी मोठं मोठाले सर्प पकडीत जंगलात सोडले आहेत