Home » माझा बीड जिल्हा » उद्याच्या जिल्हास्तरीय बैठकीस उपस्थित रहा -कागदे.

उद्याच्या जिल्हास्तरीय बैठकीस उपस्थित रहा -कागदे.

उद्याच्या जिल्हास्तरीय बैठकीस उपस्थित रहा -कागदे.
बीड /डोंगरचा राजा आँनलाईन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व क्रियाशील कार्यकर्ते/पदाधिकारी यांना कळविण्यात येते की,कोरेगाव-भीमा येथील दंगलीचा मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यास तातडीने अटक करण्यात यावी, अट्रॉसिटी कायदा अधिक तीव्र व सक्षम करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, गायरान जमिनी नावे करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात,ग्रामसभा/ग्रामपंचायत च्या घरकुला ला ठराव देण्याची अट रद्द करण्यात येऊन सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, शहरी भागातील गोर-गरिबांना विना अट घरे उपलब्ध करून देण्यात यावीत, विद्यार्थ्यांच्या शिष्यवर्ती मध्ये वाढ करण्यात येऊन ती विना विलंब विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, मागासवर्गीयांच्या सर्वच महामंडळास विना विलंब निधी उपलब्ध करून द्यावा तसेच प्रलंबित सर्व कर्ज प्रकरणे निकाली काढून लाभार्थ्यांना त्याचे लवकर वाटप करावे आदी मागण्यासाठी येत्या जून महिन्यात बीड येथे काढण्यात येणाऱ्या”विराट मोर्च्याच्या”तयारी साठी व पुणे येथे दि.27/05/18 रोजी पक्षाच्या वतीने आयोजित अधिवेशनाच्या पूर्व तयारी साठी दि.22/05/18 (मंगळवार)रोजी सकाळी ११ वाजता हिना हाँटेल जालना रोड बीड येथे रिपाईच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे युवा प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.