Home » राजकारण » स्था.स्व.संस्थेच्या निवडणूकीसाठी शुभसंकेत !

स्था.स्व.संस्थेच्या निवडणूकीसाठी शुभसंकेत !

स्था.स्व.संस्थेच्या निवडणूकीसाठी शुभसंकेत !
डोंगरचा राजा / आँनलाईन
– राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील लोणी सोसायटीवर ना. पंकजाताई मुंडे यांचे वर्चस्व ; धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा धुव्वा*

परळी दि. २०—- गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणा-या तालुक्यातील लोणी सेवा सहकारी सोसायटीवर सर्वच्या सर्व तेरा जागा जिंकून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या पॅनलने वर्चस्व स्थापन केले आहे. हा निकाल धनंजय मुंडे यांना धक्का देणारा ठरला असून उद्या होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ना. पंकजाताई मुंडे यांचेसाठी शुभसंकेत मानला जात आहे.

लोणी सेवा सहकारी सोसायटीच्या तेरा जागांसाठी आज निवडणूक होवून लगेच मतमोजणी पार पडली. ही सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात होती. त्यांनी व राष्ट्रवादीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती परंतु मतदारांनी त्यांना साफ नाकारले. या निवडणूकीत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने धनंजय मुंडे यांच्या पॅनलचा धुव्वा उडवित सर्वच्या सर्व म्हणजे तेरा जागांवर मोठ्या मतांच्या फरकाने विजयी पटकावला. पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वश्री नारायण सोनवणे, प्रल्हाद शिंदे, सुर्यभान सोनवणे, दिगंबर सोनवणे, भानुदास देवकते, भास्कर शिंदे, वसंत सोनवणे, चिंतामण यमगर, भानुदास केदारे, ज्ञानोबा सातपुते, कौशल्या सोनवणे, गोदावरी सोनवणे, मुक्ताबाई सोनवणे यांचा समावेश आहे. पॅनलच्या विजयासाठी पंचायत समितीचे सदस्य भरत सोनवणे यांच्यासह संजय देवकते, विकास हजारी, विठ्ठल शिंदे, पिंकल देवकते, रघुनाथ शिंदे, संतराम सोनवणे, दत्ता शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

*शुभसंकेत देणारा निकाल*
—————————-
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी उद्या सोमवारी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात मतदान होत आहे, या पार्श्वभूमीवर लोणीचा लागलेला हा विजयाचा गुलाल ना. पंकजाताई मुंडे यांचेसाठी शुभसंकेत आहे अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. सोसायटीच्या सर्व विजयी उमेदवारांचा आज सायंकाळी परळी येथे निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला व सर्वाचे अभिनंदन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
●●●●

Leave a Reply

Your email address will not be published.