सुरेश धस हे जगदाळेंची पाठ लोळवणार-अँड.तांदळे
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड :- लातूर-बीड-उस्मानाबाद च्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे महायूतीचे उमेदवार सुरेश धस हे अपक्ष पण नाईलाजाणे राष्ट्रवादीच्या पाठींब्या वर उभे असलेले जगदाळे यांची निवडनुकित पाठ लोळवणार असे मत भाजपा जिल्हासरचिटनीस अँड.सर्जेराव तांदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
लोकनेत्या ना.पंकजाताईसाहेब यांनी प्रतिष्ठा पणाला लाउन सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे.सुरेश धस यांनी जि.प.निवडनुकी नंतर सत्तास्थापने साठी केलेली मदतीची परतफेड म्हणून ना.ताईसाहेब यांनी सुरेश धस यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे राष्ट्रवादिला धक्का दिला आहे.सुरेश धस हे मुरब्बी नेते तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाचा अनुभवाचा नक्कीच फायदा या निवडनुकित होणार आहे.भ्रष्ट राष्ट्रवादिचे स्वंयघोषित नेते फक्त पोकळ गप्पा मारण्यात दंग आहेत.परंतु ना.ताईसाहेब यांचे मास्टरस्ट्रोक हे धस यांना विजयी करणारच.आधीच ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने उमेदवारी माघारी घेतल्यामुळे राष्ट्रवादी वर अपक्ष उमेदवाराला पाठींबा देण्याची नामुष्कि ओढावली आहे.विरोधी पक्ष नेते तर अश्या काही नंदनवनात वावरत आहेत कि जसा काय त्यांचा उमेदवार विजयी झाला आहे.शेतकार्यांच्या जमीनी खोट्या पनाने लुबाडून स्वता: निष्कलंक पने वागत आहेत.सुरेश धस हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळे त्यांना पोटशूळ झाले आहे.ना.ताईसाहेब यांची मेहनत,त्यांच्या जादुच्या कांडीचा करिष्मा,सुरेश धस यांचा राजकीय अनुभव व सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत याचा संगम म्हणजे सुरेश धस यांचा विजय हा होणारच असे अँड.तांदळे यांनी प्रसिद्धिपत्रका द्वारे म्हटले आहे.