Home » माझी वडवणी » शिवसेनेचे महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

शिवसेनेचे महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

शिवसेनेचे महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

डोंगरचा राजा आँनलाईन | दिंद्रुड

बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नियोजनाखाली शिवसेना माजलगांव तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या सौजन्याने माजलगांव तालुक्यातील शिव सेना नेते अप्पासाहेब जाधव यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन दिंद्रुड येथिल जि. प. प्रा.शाळेत केले होते.
हिंदुर्हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ जनसेवेचा वसा उचलणारे माजलगांव तालुक्यातील अप्पासाहेब जाधव हे उभरते नेतृत्व उदयास येत आहे.सर्व सामान्य नागरिकांच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या जाधव यांनी माजलगांव तालुक्यात ठिकठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन केले असुन दिंद्रुड येथिल आरोग्य शिबीरात पाचशेच्या वर रुग्णांनी आरोग्य तपासणी केली.नेत्ररोग तद्न ठाणे येथिल डाॅ. गणेश जाधव,प्रतिक जाधव, अक्षय मानकर, डाॅ. सचिन बारवकर, सोमेश्वर बारवकर यांनी रुग्णांची तपासनी केली. यावेळी तिनशे रुग्णांचे डोळे तपासत चष्मे वाटप केली.जवळपास शंभर रुग्णांची डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज असुन पुढिल महिण्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्याचे अश्वासन अप्पासाहेब जाधव यांनी दिले आहे.
दिंद्रुड येथिल शिबीरास नारायण चांदबोधले, संजय शिंदे,नाखलगाव चे लक्ष्मण सोळंके,उपसरपंच पाशा यांनी श्रमदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published.