Home » माझा बीड जिल्हा » रोटरीच्या नेत्र-शिबिरात ११० रुग्णांची तपासणी.

रोटरीच्या नेत्र-शिबिरात ११० रुग्णांची तपासणी.

रोटरीच्या नेत्र-शिबिरात ११० रुग्णांची तपासणी

डोंगरचा राजा / आँनलाईन
पाटोदा – 20 मे रोजी पाटोदा येथील आनंद क्लॉथ सेंटर व आनंद हॉस्पिटल नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ,रोटरी क्लब पाटोदा यांनी नगरपंचायत जवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयात नेत्र शबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात एकूण ११० रुग्णाची तपासणी करण्यात आली तर शस्त्रक्रियेसाठी ४० रुग्ण आनंद हॉस्पिटल नगर येथे पाठविण्यात आले .
आत्तापर्यंत झालेल्या सात शिबिरात १३०० रुग्णाची तपासणी करण्यात आली
रोटरी क्लब पाटोदा आयोजित दरमहा तिसऱ्या रविवारी होणाऱ्या या शिबिरला तालुक्यातून विशेषत ग्रामीण भागातून लोक मोठ्या संखेने सहभागी होत आहेत शिबीर यशस्वी करण्यासाठी  आनंद हॉस्पिटल नगरहुन किरण कवडे,सुशील गाडेकर यांच्या टीमने काम पाहिले तर पाटोदा  रोटरी चे अध्यक्ष वसंतलाल गुगळे,कु.सुरेखा खेडकर,शिवाजी घरत,महादेव सुरवसे,संजय राख,अतुल शिंदे, म.द.क्षीरसागर प्रशांत देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.