Home » ब्रेकिंग न्यूज » बीडमध्ये कर्करोगावर पहिली शस्त्रक्रिया.

बीडमध्ये कर्करोगावर पहिली शस्त्रक्रिया.

बीडमध्ये कर्करोगावर पहिली शस्त्रक्रिया.

डोंगरचा राजा आँनलाईन । बीड

बीड जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच काचबिंदूसाठी लेसरद्वारे पेरिफेरल ऐरिडेक्टोमी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुखकर्क रोगावर झालेली ही शस्त्रक्रिया तब्बल अकरा तास चालली. डॉ. एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिनाक्षी सोळंके, डॉ. संकेत बाहेती, श्रीमती भाग्यश्री शिंदे, जयश्री उबाळे, गिरीजा साळवे, मिता लांबोरे, महेंद्र भिसे, वर्षा कुलकर्णी, हनुमंत तुपे, श्रीराम माने, हनुमंत माळी व राजू क्षीरसागर यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ रेणुका संदीकर व सुभाष बडे यांनी भूलतज्ञ म्हणून काम पाहीले.

बीड उपजिल्हा रुग्णालय केज येथेही डॉ. एकनाथ पवार यांनी टोरीक फोल्डेबल इन्ट्राऑकूलार लेन्स टाकून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर चष्मा लावावा लागत नाही. ही शस्त्रक्रियाही या रूगणालयात पहिल्यांदाच करण्यात आली.

डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संजय पाटील व डॉ. सतीश हरिदास यांनी नियोजन केले. डॉ. थोरात यांनी या शस्त्रक्रियेची माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना दिली असता तात्काळ त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन रुग्णास भेट दिली व जिल्हा शल्यचिकित्सकांसह शस्त्रक्रियागृहातील व नेत्र विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.