Home » माझा बीड जिल्हा » पाटोदा येथे भव्य कीर्तन महोत्सव.

पाटोदा येथे भव्य कीर्तन महोत्सव.

पाटोदा येथे भव्य कीर्तन महोत्सव.
पाटोदा /डोंगरचा राजा आँनलाईन
– श्री विष्णुयाग व धोंडेमहात्म्य कथेचे आयोजन.
अधिक मासानिमित प्रती तीन वर्षानंतर होत असलेल्या पाटोदा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानवर यावर्षीही दिनांक 22 मे ते 29 मे या कालावधीत भव्य दिव्य असा महिला कीर्तन महोत्सव, श्री विष्णुयाग, धोंडेमाहात्म्य कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे मठाधिपती महंत सतीष महाराज उरणकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाटोदा व पंच क्रोषितील महिला मंडळाच्या सहकार्यातून सौ. सुनंदाताई सतीष महाराज यांच्या आयोजना खाली व ह. भ. प. संगीताताई सोळसकर (पांचाळ) यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या महिला कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातिल नामवंत महिला गायक, वादक, भजनी, कितर्नकार महिलांची उपस्तिथी लाभणार आहे. दररोज सकाळी 4ते 6 काकड़ा, सकाळी 8 ते9 तुलसीअर्चन, 10ते12 गाथाभजन, दुपारी 1ते 4 धोंडे
माहात्म्य कथा होणार आहे. तसेच 4 ते 6 हरिपाठ सायंकाळी 7 ते 9 कीर्तन,भोजन
प्रसाद व त्यानंर संगीत भजन, हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
या सप्ताहात दि. 22 मे रोजी झी टॉकीजफेम बालकीर्तनकार ह. भ. प. गायत्रीताई घोड़के आळंदी, दि. 23 रोजी ह.भ.प.राधाताई महाराज (आई साहेब) दि. 24 रोजी भागवताचार्य ह. भ. प. कविताश्रीजी साबळे शिर्डी, दि. 25 मे रोजी ह.भ.प. शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख इंदुरिकर , दि. 26 रोजी ह.भ.प.प्रतिभाताई गायकवाड़ बीड , दि. 27 रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प. संगीताताई व्यवहारे औरंगाबाद , दि. 28 मे रोजी ह. भ. प. गौरीताई सांगळे शिवचरित्रकार पंढरपूर यांची कीर्तनसेवा होणार आहे. दि. 28 मे रोजी दिंडी प्रदक्षिणा व दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 29 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ. प. उषाताई महाराज उम्रदकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असुन त्यानंतर सौ. चित्रावती बाळासाहेब (आबा)जाधव यांची काला महाप्रसाद पंगत होईल. अशा या भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सवात धोंडेमाहात्म्य कथा प्रवक्त्या ह.भ. प. सिंधुताई रोहिदास येवले व ह. भ. प. भीमाताई गोवर्धन जाधव या आहेत. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध महिला पखवाजवादक ह. भ. प. ज्ञानेश्वरीताई तम्मलवार(क्षिरसागर )
व अंजलीताई शिंदे तर ह. भ. प. सुमनताई ऊटे चाकन या हार्मोनियम साथ देणार आहेत. तर गायनासाठी ह.भ.प. राधाताई पांचाळ, ह. भ. प. भारतीताई गाडेकर, ह.भ.प. संगीताताई सोळसकर, ह. भ.प. कमलनानी पोपळघट,ह. भ. प. द्वारकाबाई बोराडे,ह.भ.प. स्वरांजली हिंगे, ह.भ.प. नंदाताई आमटे यांच्यासह अनेक नामवंत गायक तसेच महिला भजनी मंडळ सहभागी होणार आहेत. कीर्तन, धोंडेमहात्म्य कथा, विष्णुयाग यज्ञ, भजन या सर्व कार्यक्रमाचा भविकानी मोठ्या संखेने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन पाटोदा व पंचक्रोशीतील महिला मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.