नगराध्यक्षपदी सौ.मंगलताई मुंडें बिनविरोध.
डोंगरचा राजा / आँनलाईन
येथील नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्याने त्या बिनविरोध निवडुन आल्या. वडवणी नगरपंचायत च्या नगराध्यक्षपदी सौ.मंगल राजाभाऊ मुंडे दुस-यांदा विराजमान झाल्या आहेत. त्यांचा च्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची अतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने २५ मे रोजी नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडुन जोरदार तयारी करण्यात आली होती. भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे यांच्याकडे बहुमत असल्याने ते म्हणतील तोच नगराध्यक्ष होईल अशी स्थिती निर्माण झाल्याने . सध्याच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनीच पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.आज उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती . सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वा इतर कोणाचा अर्ज दाखल झाला नसल्यामुळे
सौ.मुंडे ह्या बिनविरोध नगराध्यक्ष ठरल्या आहेत.त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शहरातील चौका-चौकात फटाक्यांची अतिषबाजी करुन कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.तसेच शहर आणि तालुकाभरात भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे ,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबरी मुंडे यांच्या नियोजनबद्ध प्रक्रियेची वाहवा केली जात आहे.तर सर्वत्र राजकीय चर्चेला जोर चढला असुन अनेक जण अनेकांच्या वेगवेगळ्या चुका झाल्या ते पटवून देऊ लागले आहेत.