Home » माझा बीड जिल्हा » धनंजय मुंडेंची घोषणा दुर्दैवी – आ.देशमुख.

धनंजय मुंडेंची घोषणा दुर्दैवी – आ.देशमुख.

धनंजय मुंडेंची घोषणा दुर्दैवी – आ.देशमुख.

बीड / डोंगरचा राजा आँनलाईन.
नोकरीचं अमिष दाखवून स्वतःच्या न झालेल्या जगमित्र कारखान्यासाठी गोरगरीब शेतक-यांच्या फुकटात जमिनी लाटणा-या धनंजय मुंडे यांनी आता पर्दाफाश होताच आजच्या बाजार भावाप्रमाणे जमिनी परत देण्याची घेतलेली भूमिका दुर्दैवी व हास्यास्पद आहे असा घणाघात करून आ. आर. टी. देशमुख यांनी शेतक-यांवरील त्यांचे प्रेम हे भंपक व बेगडी असल्याची टीका केली आहे.

तळणी ता. अंबाजोगाई येथील शेतकरी मुंजा गिते यांनी पत्र पाठवून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या खोटारडे पणाचा बुरखा नुकताच फाडला. विविध माध्यमांनी हया प्रकाराला वाच्यता फोडताच धनंजय मुंडे गडबडले. काल बीड येथे पत्रकार परिषद घेवून कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी आजच्या बाजार भावाप्रमाणे परत देण्याचे जाहीर केले. संबंधित शेतक-याने आवाज उठवला नसता तर त्यांनी खरंच ही भूमिका घेतली असती का? असा सवाल आ. देशमुख यांनी केला आहे.

कारखान्यात नोकरीचं आश्वासन देऊन फुकटात जमिनी लाटल्या.कारखाना काही झाला नाही. मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या आणि
जे जीवावर उदार झाले त्यांना खोटे चेक दिले. चेक ज्यावेळी बॅकेत वठले नाहीत त्यावेळी चेक दिलेच नव्हते अशी भुमिका त्यांनी घेतली होती असे आ. देशमुख म्हणाले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी फुकटात घेतल्या त्यांना त्यांच्याच जमिनी चारपट भावाने परत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी यावर किती विश्वास ठेवायचा? असा सवाल करताना मधल्या काळात त्या जमिनींतून करोडो रुपयांच्या गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन करुन त्या जमिनी वापरण्यायोग्य ठेवलेल्या नसल्याने धनंजय मुंडेंनी जमिनी पुर्ववत करुन शेतकऱ्यांना विनाअट परत कराव्यात अशी मागणी आ. देशमुख यांनी केली आहे.

*खरं उघडकीस आल्यामुळे भाजपवर आरोप*
—————————-
शासनाच्या जमीन घेण्याच्या निर्णयाला विरोध केला म्हणून माझ्या बदनामीचे षडयंत्र भाजप नेते करत असल्याचा धनंजय मुंडे यांनी केलेला आरोप हा नैराश्यापोटी केला आहे. शेतक-यांच्या जमिनी लाटल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सदर प्रकरण त्या शेतक-याने पत्र पाठवून उघड केले आहे, जमीन घेतल्याचे त्यांनी कबुल देखील केले आहे असे असताना भाजप नेत्यांवर खोटे आरोप करणे त्यांच्या पदाला शोभत नाही असेही आ. देशमुख यांनी म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.