Home » राजकारण » जगदाळेंचा विजय काळ्या दगडावरची रेघ – धनंजय मुंडे

जगदाळेंचा विजय काळ्या दगडावरची रेघ – धनंजय मुंडे

जगदाळेंचा विजय काळ्या दगडावरची रेघ – धनंजय मुंडे
बीड / डोंगरचा राजा आँनलाईन
राज्यातील आणि देशातील जातीयवादी शक्तींचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढत आहेत. त्यामुळेच बीड-लातूर-उस्मानाबादच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री.अशोक जगदाळे यांना काँग्रेस पक्षाचा संपुर्ण पाठींबा असल्याची ग्वाही माजी खासदार तथा काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.रजनीताई पाटील यांनी दिली. तर आघाडीकडे पुर्ण बहुमत असल्यामुळे श्री.जगदाळे यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास विधान परिषद विरोधी ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील आघाडीचे उमेदवार श्री.अशोक जगदाळे यांच्या प्रचारार्थ आज बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य आ.अमरसिंह पंडीत, माजी आ.पृथ्वीराज साठे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, काँग्रेसचे नेते प्रा. टि.पी. मुंडे सर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते अक्षय मुंदडा, संदिप भैय्या क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य संजय भाऊ दौंड, महिला अध्यक्षा सौ.रेखाताई फड आदी उपस्थित होते. उपस्थित दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आम्ही एक दिलाने, एक मताने एकत्र असल्याची ग्वाही दिली. यावेळी बोलताना सौ.रजनीताई पाटील यांनी आम्ही एक मताने, एक मनाने एकत्र असल्याचे सांगितले. राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रित लढत आहेत. भविष्यातही एकत्र लढणार असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते श्री.जयदत्त अण्णा क्षीरसागर हे आमच्या सोबतच असून, ते आमचे नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणुक आम्ही लढत असल्याचे श्री.मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.