Home » महाराष्ट्र माझा » ६ साखर कारखान्याने २०६ कोटी रुपये थकवले?

६ साखर कारखान्याने २०६ कोटी रुपये थकवले?

६ साखर कारखान्याने २०६ कोटी रुपये थकवले?
– गुन्हे दाखल करा- अँड.देशमुख.

बीड /डोंगरचा राजा आँनलाईन.
शेतकऱ्याचा ऊस साखर कारखान्यांनी खरेदी केला की, पंधरा दिवसात उसाचा शासनाने निश्चित केलेला हमीभाव शेतकऱ्याला द्यावा लागतो. पंधरा दिवसात पैसे दिले नाहीत तर लगेच कारखान्यांच्या लोकांवर शुगर केन कंट्रोल ऍक्ट १९६६ अन्वये फौजदारी गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे. तरीही जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे दोनशे सहा कोटी रुपये थकवले आहेत. या कारखान्यांच्या लोकांना गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठवावे. या कारखान्यांचा गाळप परवाना रद्द करावा आणि शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्यावेत, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.
जन आंदोलनाने याबाबत राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. विशेष म्हणजे या सहा कारखान्यांमध्ये पालक मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
एकीकडे शेतकरी उन्हात होरपळत आहे. उसाला सोडायला पाणी नाही. शेतीची मशागत करणे सध्या चालू आहे. शेतकऱ्यांना आता महिनाभरात पेरणीही करायची आहे. हा त्यांच्या हक्काचा पैसा आहे. मात्र कारखानदार नियम पाळत नाहीत. सरकारमध्ये असलेले लोकच जर नियम मोडत असतील तर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायच्या कुठं ? हा प्रश्न आहे. त्यामुळे या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
साखर आयुक्तालयातून प्राप्त माहितीनुसार बीड जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे एफ. आर. पी. ची रक्कम थकली आहे.
या कारखान्यांची नावे आणि त्यांच्याकडील थकीत रक्कम या प्रमाणे आहे. जय महेश साखर कारखाना, माजलगाव – ८३ कोटी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी – ३३ कोटी, जय भवानी सहकारी a कारखाना, गढी – ५८ कोटी, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना – २२ कोटी, छत्रपती साखर कारखाना माजलगाव – ३ कोटी आणि अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना – ८ कोटी याप्रमाणे थकीत रकमा आहेत. थकीत रकमांचा हा आकडा दि. १५ एप्रिल २०१८ रोजीचा आहे.
राज्य सरकारचे सहकार खाते लुळे पांगळे झाले असल्यानेच असले प्रकार घडत आहेत. एकीकडे सरकार चालवायचं आणि दुसरीकडे सरकार मधील लोकांना वाचवायचं असा हा एकूणच प्रकार आहे. या लोकांवर साखर आयुक्त कारवाई का करत नाहीत, असा प्रश्नही अँड. अजित देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.