Home » ब्रेकिंग न्यूज » १६ शिक्षकांच्या जिल्हाबाह्य बदल्या.

१६ शिक्षकांच्या जिल्हाबाह्य बदल्या.

१६ शिक्षकांच्या जिल्हाबाह्य बदल्या.
डोंगरचा राजा/आँनलाईन
ऑनलाईन बदली प्रक्रियेस सुरुवात; परळी तालुक्यातल्या १६ शिक्षकांच्या जिल्हाबाह्य बदल्या.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेला उन्हाळी सुट्‌ट्यांमध्ये सुरुवात झाली. बदल्या काही जणांना सुखद तर काहींना दुखद धक्के बसू लागले. बदली प्रक्रियेला काही शिक्षक संघटनांनी समर्थन दिले होते, तर काहींनी विरोधही केला होता. अशा अवस्थेत तालुकास्तरावर बदल्या होत असून परळी तालुक्यातील १६ शिक्षकांच्या जिल्हाबाहेर बदल्या झाल्या आहेत. काही शिक्षक अनेक दिवसांपासून सोयीच्या ठिकाणी बसलेले होते. अशा शिक्षकांनाही बदल्यांना तोंड द्यावे लागणार आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्‌ट्यांमध्ये बदलीची प्रक्रिया राबविली जात असते. मात्र राज्य सरकारने दिवाळीच्या सुट्‌ट्यात बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची घोषणा केली होती. या प्रक्रियेला काही संघटनांनी विरोध केल्याने ही बदली प्रक्रिया उन्हाळी सुट्‌ट्यांमध्ये राबवणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. आता सध्या उन्हाळी सुट्‌ट्या असल्याने जिल्हाभरात बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. काही शिक्षकांना धक्के बसले तर काहींना बदली अडचणीची ठरू लागली. जिल्हाभरातील बहुतांश शिक्षक सोयीच्या ठिकाणी शाळेवर ठाण मांडून बसले होते, अशा शिक्षकांना बदलीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. परळी तालुक्यातील १६ शिक्षकांच्या जिल्हाबाहेर बदल्या झाल्याने सदरील शिक्षक चांगलेच पेचात पडले आहेत. या बदली प्रक्रियेमध्ये भीमसिंग दाऊ मावची, सरुबाई दगडुबा मोंढे, सतीश अमृतराव वाडकर, दत्तात्रय धोंडीबा जाधव, दीपक नागनाथ स्वामी, शत्रुघ्न मारोती सागर, धनराज अशोकराव परगे, बबन भोईसिंग राठोड, शिवाजी दिगांबर इंदराळे, कौंदा श्रीपतराव सांगवीकर, संभाजी सुंदरराव पुणेकर, रुपाली हनुमंत पिंडकुरवार, सुनिल शिवाजीराव वसवे, शिवकांता व्यंकटराव भोसले, गणेश दत्तात्रय पुरी, मुजाहेद बशिरुज्जमा सिद्दीकी या १६ शिक्षकांच्या जिल्ह्याच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.