Home » माझी वडवणी » व्हरकटवाडीत रोटरी चे श्रमदान.

व्हरकटवाडीत रोटरी चे श्रमदान.

व्हरकटवाडीत रोटरी चे श्रमदान.
डोंगरचा राजा / आँनलाईन
अमिर खान यांनी सामाजिक जानिवेतुन दृष्काळग्रस्त भागात राबवलेल्या पाण्याच्या जागृतीसाठी वाॅटर कप स्पर्धा धारुर तालुक्यातील व्हरकटवाडी सह इतर गावात सुरु आसुन लोकसहभागासह श्रमदानाचा ओघ सुरु आसतांना माजलगाव येथील रोटरी क्लब मात्र सेन्ट्रल ने आज दि.१७ रोजी व्हरकटवाडी या डोंगर कपारित जावुन तब्बल ४ तास श्रमदान करुन मोठा बंधारा उभा केला.
पाण्यासाठी अनेक समाज सेवी संस्थेसह चिञपट क्षेञातील मान्यवरांनी स्वताःला झोकुन देत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ पाण्याअभावी आपल्या शेतातील नापिकीमुळे आनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याने हे कुठे तरी थांबले पाहिजे म्हणुन पुढाकार घेत पाणी फाऊंडेशन च्या मार्फत महाराष्ट्रातील आनेक गावातील दुर्गम व दृष्काळी गावांची निवड करण्यात आली आसता बीड जिल्हातील धारुर तालुक्यातील अत्यतं दुर्गम भागात आसलेली व उसतोड मजुराचे गाव म्हणुन ओळख आसलेले व्हरकटवाडी हे अख्ख गाव आपल्या गावात पाणी पाणी करण्यासाठी लहान मुलापासुन ते अबालवृध व महिला पासुन सतत मेहनत करित आसुन गेल्या वर्षी या वाॅटर कप स्पर्धेत धारक तालुक्यात दुसऱ्या क्रमाक आला होता.या वर्षी पुन्हा या गावाने प्रचंड मेहनत घेतल्यामुळे गेल्या वर्षीच्या आठलेल्या विहिरील आज भर उन्हाळ्यात पाणी आसल्याचे दिसते.म्हणून या गावातील बहुतांशी लोक उस तोडणीसाठी बाहेर जात आहेत.माञ आपल्याच शेतात या माध्यमातुन पाणीच पाणी करु म्हणूनराञ न दिवस मेहनत घेत आसल्याने या ठिकाणी आनेक सामाजिक संस्था व इतर समाजसेवी यांनी हे गाव निश्चित या वर्षी वाॅटर कप साठी बीड जिल्ह्यातील अंबेसटर म्हणुन ओळखले जात आसल्याने अत्यंत कमी कालावधीत वाॅटर कप स्पर्धेचे आपले उदिष्ट पुर्ण केले आसतांना माजलगाव येथील डाॅ.यशवंत राजेभोसले अध्यक्ष आसलेल्या रोटरी क्लब आॅफ माजलगाव सेन्ट्रल च्या टिम ने दि.१७ रोजी सकाळी व्हरकटवाडी येथे जावुन एका डोंगर कपारीत जावुन तब्बल चार तास श्रमदान करुन त्या ठिकाणी दगडाचा बंधारा उभारुन आपले सामाजिक भावनेतील श्रमदान केले या वेळी रोटरी चे अध्यक्ष डाॅ.यशवंत राजेभोसले,सचिव अंकुश राठोड,माजी आध्यक्ष डाॅ.सुनिल गरड,माजी सचिव विनोद जाधव ,काटकर, सुभाष नाकलगावकर ,दिलिप झगडे,सह छोटा गरड यांनी श्रमदान करुन आपला सहभाग नोदंवत महाराष्ट्रात पहिले येण्यासाठी व्हरकटवाडी येथील गावक-याना शुभेच्छा दिल्या.येथिल सरपंच ललिता व्हरकटे यांनी सर्वांचे स्वागत करित ग्रामस्थांचे मनोबल वाढवल्याबाबत रोटरी क्लबचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.