Home » माझी वडवणी » नगराध्यक्ष पदासाठी सौ.मंगल मुंडेंचा अर्ज दाखल.

नगराध्यक्ष पदासाठी सौ.मंगल मुंडेंचा अर्ज दाखल.

नगराध्यक्ष पदासाठी सौ.मंगल मुंडेंचा अर्ज दाखल.
वडवणी / डोंगरचा राजा आँनलाईन
येथील नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्याने २५ मे रोजी नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडुन जोरदार तयारी करण्यात आली असुन भाजपचे नेते राजाभाऊ मुंडे यांच्याकडे बहुमत असल्याने ते म्हणतील तोच नगराध्यक्ष होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यातच सध्याच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनीच पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.आज उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख असुन सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणाचा अर्ज दाखल केला जातो याकडे लक्ष वेधले जात आहे. तत्पुर्वी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी पवार मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी एल.एम.राठोड यांच्या कडे कार्यालयीन वेळेत नगराध्यक्ष पदासाठी सौ.मंगल राजाभाऊ मुंडे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.आज उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असुन विरोधी गटाकडुन कोणाचा उमेदवारी अर्ज दाखल होतो याकडे लक्ष वेधले जात आहे. दुसरीकडे नगराध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे शहरासह तालुकाभरात राजकीय चर्चेला जोर चढला असुन अनेक जण अनेकांच्या वेगवेगळ्या चुका झाल्या ते पटवून देऊ लागले आहेत. याचबरोबर सामान्य नागरिक देखील या चवीच्या चर्चेत रंगला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.