Home » माझा बीड जिल्हा » दिलीप भोसलेंचा ७ हजार निराधारांना आधार.

दिलीप भोसलेंचा ७ हजार निराधारांना आधार.

दिलीप भोसलेंचा ७ हजार निराधारांना आधार.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– 1005 लाभार्थ्यांची नावे यादीत.
बीड – तालुक्यातील निराधार योजनेच्या सात हजार लाभार्थ्यांंनी 2017 पूर्वी अनुदानासाठी ऑफलाईन पध्दतीने फॉर्म भरले होते. परंतु 2017 च्या परिपत्रकानुसार हे लाभार्थी पात्र होत नव्हते. पैसे खर्चुन सुध्दा लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले. यामुळे वेळोवेळी आंदोलने करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भोसले यांनी जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत तहसीलदार अविनाश शिंगटे यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली व वस्तुस्थिती मांडली. या प्रकरणाची तहसीलदारांनी दखल घेत सामाजिक बांधिलकीतून जवळपास सात हजार लाभार्थ्यांचे ऑफलाईन प्रकरणे तहसील प्रशासन 15 दिवसांत ऑनलाईन करणार असल्याचे सांगितले. यासाठी लागणारे दोन ऑपरेटर स्वखर्चातून दिलीप भोसले देणार असून 15 दिवसांत प्रकरणे ऑनलाईन करुन तहसीलदार लाभार्थ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे लाभाथ्यार्थ्यांची हेळसांड थांबणार असून ऑनलाईनचे काम दोन दिवसांत तहसील कार्यालयात सुरू होणार आहे.
दिलीप भोसले यांच्या प्रयत्नामुळे ऑफलाईनमधील सात हजार लाभार्थी, यादीत नाव नसलेले 1005 लाभार्थी, अंगठा उमटत नसलेले 450 लाभार्थी यांनाही लाभ भेटणार असून उर्वरित यादीत नाव नसलेले व अंगठा उमटत नाही अशा लाभार्थ्यांशी तहसीलमध्ये संपर्क साधावा असे आवाहन भोसले यांनी केले आहे. दरम्यान तालुक्यातील हजारो लाभार्थ्यांची वणवण व त्यांची दलालांच्या तावडीतून सुटका होणार आहे. ऑनलाईनसाठी पैसे मागतील त्यांची तहसीलदारांकडे नावासह तक्रार करावी असे आवाहन दिलीप भोसले यांनी केले. दरम्यान सामाजिक बांधिलकीतून काम केल्याबद्दल तहसीलदार यांचे शिष्टमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या शिष्टमंडळात अशोक शेजवळ, शेख खाजा  पठाण, बंडू झांबरे, आराफताई, वंदना जाधव, अम्मु पठाण, राम गायकवाड, झुंबर लोणकर, विकास माने तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.