Home » माझी वडवणी » हातोल्यात “तुफान आलं या”..

हातोल्यात “तुफान आलं या”..

हातोल्यात “तुफान आलं या”..
डोंगरचा राजा / आँनलाईन
▪ एक दिवसात 2 हजार घनमिटरचे खोदकाम.
▪ विविध संघटना व संस्थांचा पुढाकार.
▪ cm ग्रा.सा.प.अभियानची टीम हातोल्यात.
▪ सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त नवा उपक्रम.

अंबाजोगाई – जलसंधारणाची चळवळ गावोगावी आता गतीमान होवू लागली आहे. बुधवारी सकाळी हातोल्यात झालेल्या महाश्रमादानात ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे दिड हजार लोक श्रमदानात सहभागी झाले. एकाच दिवसात श्रमदानाच्या माध्यमातून दोन हजार घनमिटरचे खोदकाम श्रमदानातून झाले. आज हातोल्यात मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानची टीम दाखल झाली व या टीमने या गावात झालेल्या विविध कामांची पाहणी केली. हातोला येथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच अ‍ॅड. जयसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाश्रमदानाचा उपक्रम राबविला. यावेळी महाश्रमदानाच्या ठिकाणीच केक कापून अ‍ॅड. जयसिंग चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

अंबाजोगाई तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत हातोला हे गाव सहभागी झाले आहे. स्पर्धेच्या प्रारंभेपासुनच हातोला गावात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. गेल्या 40 दिवसात दोनवेळा महाश्रमदान इथे झाले बुधवारी झालेल्या महाश्रमदानाला अंबाजोगाई तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. अंबाजोगाई तालुक्यातील मानवलोक, ज्ञानप्रबोधिनी, भारतीय जैन संघटना , शिवतेज ट्रेडर्स ग्रुप, एस.संस्था, वैद्यनाथ बँक कर्मचारी, मैत्री ग्रुप, वकील मित्रमंडळ, मेडीकल, फार्मासिस्ट असोसीएशन, ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, जवळगाव ग्रामस्थ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आज झालेल्या श्रमदानात आपला सहभाग नोंदविला. ग्रामस्थांसह दिड हजार महिला व पुरूष श्रमदानात सक्रिय होते. यावेळी दोन हजार घनमिटरचे खोदकाम श्रमदानातून झाले. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात श्रमदानातून काम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी एटीए चंद्रा फाऊंडेशनचे संचालक निमेशभाई शहा माजी ,नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, डॉ.दिनकर केकाण, अ‍ॅड.सुनिल पन्हाळे, भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष धनराज सोळंकी, प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

▪ मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानची टीम हातोल्यात

हातोला गावाची वाटचाल आदर्श गावाकडे होत असल्याने व वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेली क्रांती याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानचे मिशन मॅनेजर दिलीप बयास, सागर शिर्के, पंचायत समितीचे प्रकल्प अधिकारी विठ्ठल नागरगोजे, ग्रामदुत अनंत गर्जे यांनी हातोला येथील विविध कामांची पाहणी केली. या समितीने श्रमदान करून आपला सहभाग नोंदविला.

▪ 51 हजार रोख व पाचशे लिटर डिझेलची मदत

हातोला येथे आज झालेल्या महाश्रमदानाच्या वेळी आलेल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात सुरू असलेल्या कामासाठी मदत केली. यावेळी रघुवीर देशमुख यांनी 25 हजार रूपये तर राजकिशोर मोदी यांच्याकडुन 300 लिटर डिझेल, मनोज लोढा 200 लिटर डिझेल तर शेख बागन साहब पाच हजार रूपये, अभिजीत चव्हाण पाच हजार रूपये , राहुल चव्हाण पाच हजार रूपये, अरूण चव्हाण पाच हजार रूपये, मनोज चव्हाण पाच हजार रूपये, उन्नती महिला स्वयंम सहाय्यता बचत गट 1100 रूपये अशी मदत गावचे सरपंच अ‍ॅड.जयसिंग चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.