Home » महाराष्ट्र माझा » दलित पँथर चे ढाले – ना.आठवले ग्रेट भेट.

दलित पँथर चे ढाले – ना.आठवले ग्रेट भेट.

दलित पँथर चे ढाले – ना.आठवले ग्रेट भेट.
डोंगरचा राजा / आँनलाईन
*दोन दिग्गज नेत्यांच्या ग्रेट भेटीने आंबेडकरी चळवळीत आनंद*
मुंबई दि. 15 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले आणि दलित पँथर चे संस्थापक नेते ; आंबेडकरी चळवळीचे अध्वर्यू ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले या आंबेडकरी चळवळीतील दोन दिग्गज नेत्यांची काल ग्रेट भेट झाली. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या घाटकोपर पूर्वेच्या माता रमाबाई आंबेडकर नगरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला साक्ष ठेवीत या दोन दिग्गजांचे मनोमिलन झाले. तब्बल 40 वर्षांनंतर ढाले -आठवलेंची भेट झाल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
येथील गंधकुटी बुद्धविहारामागे पंथरनेते राजा ढाले यांचे कार्यलय आहे. या कार्यालायत ना रामदास आठवलेंनी राजा ढालेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद साधला. या भेटीत दोघांच्याही स्नेहसंबंधांत प्रेमाची साखरपेरणी झाली असा सुसंवाद यावेळी झाला. 40 वर्ष एकमेकांना न भेटलेल्या या नेत्यांनी एकमेकांशी केलेले हस्तांदोलन ऐतिहासिक ठरले आहे. ढाले – आठवले यांच्या या ग्रेट भेटीने आंबेडकरी चळवळीत नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

“रामदास आठवले लीडर झाले कारण पाठीशी उभे राहिले राजा ढाले ” असे मनोगत व्यक्त करीत राजा ढालेंमुळेच आपणास प्रेरणा मिळाली . आपण पँथर मध्ये काम सुरू केले त्यांचे मार्गदर्शन आपणास नेहमीच मिळाले आहे. ते आंबेडकरी चळवळीचे साहित्यिक ; ज्येष्ठ विचारवंत आणि पँथर चे संस्थापक नेते आहेर. त्यांचा आपण नेहमीच आदर करीत आलो आहोत असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले. रमाबाई आंबेडकर नगरात त्यांच्या संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वलंगकर ग्रंथालय आणि संशोधन केंद्रच्या दुमजली इमारतीसाठी आपल्या खासदरनिधीतून 40 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा ना रामदास आठवलेंनी केली तसेच लवकरच राजा ढाले यांचा वाढदिवस निष्पक्ष समिती तर्फे करण्यात येईल त्यासाठी आपण पुढाकार घेऊन समाजातर्फे राजा ढालेंना 15 लाखांची थैली देऊन सन्मानित करण्यात येईल असा संकल्प ना. रामदास आठवलेंनी व्यक्त केला.
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो असे सांगत आपण सर्व आंबेडकरवादी रकच आहोत चळवळीतुन संधीसाधूंना हद्दपार केले पाहिजे. रमाबाई आंबेडकर नगर चळवळीचे केंद्र आहे. येथे समाजाच्या उपयोगी वस्तू उभारावी. ग्रंथालय;सनदी अधिकारी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र संशोधन केंद्र उभारावे अशी अपेक्षा राजा ढालेंनी यावेळी व्यक्त. पुष्पगुछ शाल देऊन राजा ढालेंना ना रामदास आठवलेंचा तसाच आठवलेंनी ही ढालेंचा सत्कार केला यावेळी राजा ढाले यांची कन्या गाथा आणि नातू उन्नयन तसेच रिपाइं चे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published.