Home » राजकारण » “कर्नाटक” २०१९ भाजपच्या विजयाची नांदी – ना.मुंडे

“कर्नाटक” २०१९ भाजपच्या विजयाची नांदी – ना.मुंडे

“कर्नाटक” २०१९ भाजपच्या विजयाची नांदी
– ना.मुंडे

मुंबई / डोंगरचा राजा आँनलाईन
कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश म्हणजे २०१९ मधील भाजपच्या विजयाची नांदी आहे. या निकालाने जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले आहे अशी प्रतिक्रिया राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आजच्या निकालावर व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणूकीत काॅग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता त्याला कर्नाटकच्या जनतेने प्रतिसाद देत भ्रष्टाचाराला साथ देणा-या काॅग्रेसला साफ नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनबध्द प्रचार यंत्रणेमुळे कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. या यशामुळे देशभरातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. हा निकाल म्हणजे पुढील वर्षी होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणूकीतील विजयाची नांदीच आहे असे सांगून ना. पंकजाताई मुंडे यांनी कर्नाटकात भाजपचेच सरकार सत्तारूढ होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.