Home » माझा बीड जिल्हा » कनेक्ट रहा,अलर्ट व्हा – आ.क्षिरसागर.

कनेक्ट रहा,अलर्ट व्हा – आ.क्षिरसागर.

कनेक्ट रहा,अलर्ट व्हा – आ.क्षिरसागर

 डोंगरचा राजा/ आँनलाईन

अधिवेशनाचा कालावधी आणि त्यानंतर लगेच लगनसराई यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून शहरी आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही त्यामुळे आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपल्या हजारो कार्यकर्त्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. याचवेळी कनेक्ट रहा, अलर्ट व्हा, आपली कामे आणि माहिती गावागावात पोहोचवा असे सांगून केलेल्या कामाबाबत माहिती दिली तसेच केसोना गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरणाबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

गेल्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत शहरी आणि ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद होऊ शकला नाही. अनेकांना आ.जयदत्त क्षीरसागर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचा होता त्यामुळे आज मंगळवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीडसह मतदारसंघातील गावागावातून हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले. आपल्या नेत्याच्या भेटीसाठी आतूर असलेल्या कार्यकर्त्यांशी आ.क्षीरसागरांनी दिलखुलास संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, दिलीप गोरे, प्रा.जगदीश काळे, अ‍ॅड.शेख शफिक, वैजीनाथ तांदळे, अरूण डाके, प्रा.किशोर काळे, खमर अली खान, अरूण बोंगाणे आणि नगर परिषदचे सर्व सभापती, नगरसेवक उपस्थित होते.

प्रारंभी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केसोना गॅस एजन्सीमार्फत अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्ग तसेच दारिद्रय रेषेतील लोकांना उज्वला प्लस योजने अंतर्गत 100 रूपयांत गॅस कनेक्शनच्या योजनेची माहिती दिली. या योजनेची माहिती कार्यकर्त्यांनी लाभ धारकांपर्यंत पोहोचवावी व पुढाकार घेऊन गोर गरीबांना या योजनेचा लाभ मिळून द्यावा.

यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, अधिवेशनाचे कामकाज आणि त्यानंतर महिनाभराची लगन सराई यामुळे प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही. सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमामुळे संपर्क राहिला असला तरी आता कनेक्ट रहा, अलर्ट व्हा आणि आपण केलेल्या कामाची माहिती गावागावापर्यंत पोहोचवा. कागदी घोडे नाचवणारे अनेकजण आहेत आपण जी कामे प्रत्यक्षात करत आहोत ती सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमाद्वारे  लोकांपर्यंत गेली पाहिजे त्यामुळे खरे काय ते कळते. गावाला टोप्या घालून कुणाला बरकत मिळणार? योजना कागदावर ठेवून नुसता गवगवा चालू आहे त्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने आता अलर्ट रहावे. अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात आपले प्रश्‍न पोटतिडकीने मांडून त्याची सोडवणूक करून घेण्यासाठी सत्ता नसतानाही केवळ जिल्ह्यासाठी आणि मतदारसंघासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी दूध उत्पादकांसाठी आणि रस्ते विकासासाठी राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्र्यांना भेटावे लागले. आपले प्रश्‍न आणि त्याची गंभीरता सविस्तरपणे मांडून ते सोडवून घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे. आता ही कामे गावागावापर्यंत पोहोचवा. मतदारसंघात आवश्यक असणार्‍या विकास कामांना वेगवेगळया योजनेच्या माध्यमातून मंजूरी मिळवावी लागली. दूरदृष्टी ठेवून कायमस्वरूपी योजना म्हणून अमृत अटल योजना, भुयारी गटार योजना, महामार्गावरील शहरातून जाणारा 12 किलोमिटरचा रस्ता, बार्शी नाका पूल, मोठा आणि छोटा बायपास, राजुरी ते वंजारवाडी फाटा रस्ता व बसस्थानक ते फुलसांगवी रस्ता अशी महत्वाची कामे तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील वीज प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करून घेऊन ही कामे सुरू करता आली. काही मोठ्या कामांना तत्वतः मंजूरी मिळाली आहे त्यासाठीदेखील आपण संबंधीत खात्याच्या अधिकारी आणि मंत्र्यांच्या संपर्कात आहोत. बीड जिल्ह्यात रस्त्साचे जाळे विणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी आणि दिर्घकालीन योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडेही आपण आग्रही मागण्या करून त्या मंजूर करून घेण्यात यशस्वी ठरलो आहोत. पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी बंधार्‍यांची मागणी केली आहे त्याचबरोबर अंतरवण पिंप्री जवळ टुकूर प्रकल्पाची मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जवळपास 30 ते 40 गावांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल. यासाठी तेथील गावकर्‍यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे सांगून त्यांनी आपल्या केलेल्या सर्व कामांची माहिती दिली. यावेळी कार्यकर्त्यांशी दिलखुलासपणे संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.