Home » राजकारण » राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर..

राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर..

राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर..
डोंगरचा राजा / आँनलाईन
राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर एकेकाची पुंगी वाजवेन, उदयनराजेंचा इशारा.
उदयनराजे भोसले आपल्या वक्तव्यांमुळे आणि बेधडक स्वभावामुळे खासदार उदयनराजे भोसले नेहमी चर्चेत असतात.
आपल्या वक्तव्यांमुळे आणि बेधडक स्वभावामुळे खासदार उदयनराजे भोसले नेहमी चर्चेत असतात. गत आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात उदयनराजे भोसलेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची नक्कल करून दाखवली होती. पवारांना आपली कॉलर उडवण्याची स्टाईल आवडल्याने उदयनराजेंनी आनंद व्यक्त केला आहे. कुणीतरी आपल्याला दाद दिली याचेच समाधान आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळेल. जर उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष उभा राहून एकेकाची पुंगी वाजवू शकतो, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

लोककला संमेलनाच्या समारोपासाठी खासदार भोसले हे कराड येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून त्यांनी माझी कॉलरची केलेली स्टाईल आवडली. कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात ते म्हणाले, की लोकसभेची तयारी काय करायची ? काम करत राहायचे हे मी ठरवले आहे. ज्यांना अर्ज भरायचा आहे त्यांनी भरावा. लोकशाही आहे. पण लोकांचा आग्रह मी अर्ज भरावा म्हणून आहे. त्यामुळे मी कसा थांबेन? राष्ट्रवादी उमेदवारी मलाच देणार. कोणी यायचे त्यांनी मैदानात यावे, मग बघू, असा इशारा त्यांनी दिला.
सिंचन घोटाळ्यातील नेत्यांनी संरक्षण न घेता रस्त्यावर फिरून दाखवावे- उदयनराजे
अपक्ष उमेदवारीवरुन एका एकाची पुंगी वाजवू शकतो, अशा शब्दांत त्यांनी सूचक दमही दिला. उदयनराजे भोसले यांनी आपली कॅालर उडवत राष्ट्रवादीच्याच सातारा जिल्ह्यातील आमदारांना सज्जड दम भरला. लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे. राजेशाही असती तर एका-एका आमदाराला दाखवले असते. हिमत असेल तर मैदानात या. अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच असा इशारा त्यांनी दिला. माझे पोट राजकारणावर चालत नाही, मुख्यमंत्री यांच्याशी झालेली चर्चा आत्ताच का सांगू ? पण चर्चा झाली एवढे नक्की, अशी माहितीही त्यांनी दिली..

Leave a Reply

Your email address will not be published.