Home » महाराष्ट्र माझा » रणबीर कपूरने हातात घेतली कुदळ,टीकाव.

रणबीर कपूरने हातात घेतली कुदळ,टीकाव.

रणबीर कपूरने हातात घेतली कुदळ,टीकाव.
डोंगरचा राजा / आँनलाईन
राज्यातील विविध जिल्ह्यात मागीत तीन वर्षांत पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून श्रमदानातून पाणी समस्या सोडवण्यात मोठ्या प्रमाणावर यश आलं आहे. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील २४ जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. या श्रमदानात मराठी कलाकारांपासून ते बॉलिवूडचे दिग्गज कलाकारा आपला खारीचा वाटा उचलताना दिसतात. आलिया भट्ट, अक्षय कुमार, सई ताम्हणकर यांसारख्या अनेक कलाकारांनी पानी फाऊंडेशनसाठी श्रमदान केले आहे.

या सेलिब्रिटींच्या यादीत आता चॉकलेट बॉय रणबीर कपूरच्या नावाचाही समावेश झाला आहे. नुकतेच रणबीरने नंदुरबारच्या दहिंदुले आणि उमरेद या गावात श्रमदान केले. यावेळी रणबीरसोबत आमिर खान आणि किरण रावही होते.
गावात नेहमीप्रमाणे श्रमदान सुरू होते. मात्र आपल्या गावात आमिर येणार असल्याचे कळताच तिथल्या जनतेत एकच उस्ताह संचारला आणि सर्वच जोमाने श्रमदान करु लागले. साधारणतः सकाळी साडेआठच्या सुमारास गावी पोहोचला. आमिर गावी पोहोचताच गावातील तरुणांनी एकच घोषणा द्यायला सुरूवात केली.

यानंतर सगळ्यांनी श्रमदानाला सुरूवात केली. रणबीरने हातात कुदळ आणि टीकाव घेऊन गावकऱ्यांसोबत श्रमदान केले. दिवसाअखेरीस आमिरने गावातील कामाची पाहणी करुन गावकऱ्यांचे आवर्जुन कौतुक केले. खुद्द आमिरच्या तोंडून आपल्या गावचे आणि कामाचे कौतुक ऐकल्यावर प्रत्येक गावकरी सुखावला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.