Home » देश-विदेश » पाकिस्तानचं गोड खाणारांना फटके देणार – मनसे.

पाकिस्तानचं गोड खाणारांना फटके देणार – मनसे.

पाकिस्तानचं गोड खाणारांना फटके देणार – मनसे.
डोंगरचा राजा/ आँनलाईन
पाकिस्तानमधून आयात केलेल्या साखरेविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पाकमधून आलेली साखर खरेदी करु नये, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशाराच मनसेने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिला आहे.

राज्यात सध्या पाकिस्तानमधून आयात केलेल्या साखरेवरुन राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना राज्यात पाकिस्तानमधून आलेली साखर पोहोचली आहे. पाकिस्तानमधून आलेली साखर कमी दराने मिळत असल्याने याचा फटका राज्याचील साखर कारखान्यांना बसण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही पाकिस्तानमधून आयात केलेल्या साखरेविरोधात आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना इशारा दिला. ते म्हणाले, पाकिस्तानसारख्या देशाकडून साखर खरेदी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही राज्यातील कृषी उत्पन्न बाजारी समितींना पत्र पाठवले आहे. पाकिस्तानमधून आलेली साखर खरेदी करु नये, अन्यथा मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी देखील पाकिस्तानच्या साखरेवरुन सरकारवर टीका केली होती. ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानला अद्दल घडविल्याबद्दल आपण स्वत:ची पाट थोपटून घेत आहोत. दुसरीकडे पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात आहे. साखरेचे दर घसलेले असताना पाकिस्तानची साखर मुंबईत आलीच कशी?, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.