Home » देश-विदेश » ना.पंकजा मुंडेंची थेट नेपाळ बॉर्डरवर मदत.

ना.पंकजा मुंडेंची थेट नेपाळ बॉर्डरवर मदत.

ना.पंकजा मुंडेंची थेट नेपाळ बॉर्डरवर मदत.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
लातुरच्या यात्रेकरूंना ना.पंकजाताई मुंडे यांची थेट नेपाळ बॉर्डरवर मदत.
लातुरच्या दोनधाम यात्रेकरूंची बस अज्ञात लोकांनी नेपाळमध्ये पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी ( ता. ११) पहाटे घडली होती, या घटनेची माहिती कळताच दोन धाम यात्रेवर असणारे सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी तात्पुरती मदत करून राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना या घटनेची माहिती फोनद्वारे दिल्यानंतर त्यांनी तेथील प्रशासनाला तातडीने संपर्क साधून यात्रेकरूंना मदत पोहोचविली.
नेपाळमधे पशुपती नाथाच्या दोन धाम यात्रेसाठी लातुरच्या यात्रेकरूंची बस गेली होती. बरतघाट येथे गाडी परत येत असतांना फेल झाल्यामुळे प्रवाशाना सुरक्षित ठिकाणी हलवून चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली होती. चालक मेकॅनिकला घेवून परत येताच कुणीतरी अज्ञात लोकांनी गाडी नं एमएच.15 एके 1777 ही ट्रॅव्हल्स पेटवून दिल्याचे आढळले यामध्ये रोख रक्कम, किचन, कपडे असे सर्व मिळून 10 ते 12 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे लक्षात आले. याच रस्त्याने दोनधाम यात्रेवर जात असलेले सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी हे आपल्या सोबतच्या यात्रेकरूसोबत नेपाळला चालले असतांना बॉर्डवर लातुरचे सर्व यात्रेकरू रस्त्याच्या कडेला बसलेले दिसून आले तेव्हा बीड येथील सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी थांबून त्यांची विचारपुस केली. रामदास मोहीते व यात्रेकरूंनी सदर घटनेची माहिती गवळी यांना देताच त्यांना तात्पुरती मदत करून राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना या घटनेची माहीती त्यांनी फोनद्वारे देवून या यात्रकरुंना मदत करण्याची विनंती केली. ना. पंकजाताई मुंडे यांनी तात्काळ उत्तरप्रदेश मधील या भागातील भाजपाचे आमदार पंकज चौधरी व महारागंज जिल्हयाचे जिल्हाधिकारी प्रेमप्रकाश अंजारे,सोनोलीचे सर्कल बिहागराशिंग यांना आदेश दिल्यानंतर या यात्रेकरूंना येथील प्रशासन तात्काळ मदतीला धावून आले. यात्रेकरूंच्या ठिकाणी पोहचवून राहण्यासाठी धर्मशाळा,सर्वांना कपडे,अन्नधान्य व लातुरला परतण्यासाठी बसची व्यवस्था केली. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताईं मुंडे व समाज कार्यात सक्रीय असणारे बीडचे सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांचे केलेल्या सह कार्याबद्दल विषेश आभार मानले.यावेळी आजीनाथ गवळी यांचेसह ह.भ.प.भगवान महाराज बारगजे,पत्रकार प्रकाश साळवे,महादेव बडे,रावसाहेब जायभाये,संतोष शेंडगे,एकनाथ बडे आदींसह सर्व यात्रेकरूं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.