Home » विशेष लेख » आदर्श नेतृत्व एस.एम.देशमुख – महाजन.

आदर्श नेतृत्व एस.एम.देशमुख – महाजन.

आदर्श नेतृत्व एस.एम.देशमुख – महाजन.
डोंगरचा राजा /आँनलाईन.
– पञकाराच्या प्रश्ना साठी सातत्याने निस्वार्थ पणे लढणारे आदर्श नेतृत्व मा.श्री एस एम देशमूख सर.
— राज्यातिल पञकाराच्या प्रश्ना साठी गेल्या तिस वर्षा पासून सातत्याने मराठी पञकार परीषद व पञकार हल्ला विरोधी कृती समिती च्या माध्यमातून पञकाराचे प्रश्न सातत्याने मांडून पञकारा साठी केव्हाही धाऊन येणारे आदर्श नेतृत्व म्हणूण मा.श्री एस एम देशमूखहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहेत मला त्यांचे मार्गदर्शना खाली काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो .प्रत्येक पञकाराला आपलेसे वाटणाऱ्या या नेतृत्वास दिर्घआयूष्य लाभावे हि ईश्वरा कडे प्रार्थना.*
बीड जिल्ह्यातील देवडी ता.वडवणी सारख्या खेड्यातून माजलगाव ते मुंबई असा पञकारीतेचा यशस्वी प्रवास करणाऱ्या राज्यातील ग्रामीण पासून शहरा पर्यंत प्रत्येक पञकारास हक्काचे नेतृत्व वाटणारे पञकराचे नेते मा.श्री एस एम देशमूख सर हे आहेत.एस एम सरानी तालूक्या पासून चांगल्या चांगल्या दैनीकात संपादक पदा पर्यंत काम केल्या मुळे त्यांना सर्व स्तरातील पञकाराचे प्रश्नाची जाण त्यांना आहे मराठी पञकार परीषदेच्या माध्यमातून पञकाराच्या प्रश्ना साठी लढत असताना राज्यात बारा पञकार संघटना एक करून पञकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली देशात बारा संघटना एकञीत येण्याचा पहीला प्रयोग या राज्यात यशस्वी केला पञकार संरक्षण कायदा झाला पाहीजे या साठी लढा सुरू केला .या साठी सतत बारा वर्ष सातत्याने संघर्ष केला केला .उपोषण,मोर्चे काढले या साठी प्रचंड संघर्ष केला हा लढा लढत असताना किरण नाईक हे खांद्याला खांदा लावून बरोबर होते,अनेक शिलेदार सोबत होते .या लढ्यात सातत्य ठेवल्याने बारा वर्षा नंतर पञकारा साठी कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहीले राज्य ठरले या कायद्याचे जनक एस एम सरच आहेत हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे निर्भीड निपक्ष सत्या च्या मार्गाने सर संघर्ष करतात .आता या कायद्याची अंमलबजावणी साठी संघर्ष सुरू आहे पञकाराना पेन्शन साठी लढा सुरू आहे छोटी वृत्तपञ वाचली पाहीजेत या साठी संघर्ष सुरू आहे .पञकाराच्या अनेक प्रश्ना वर सराचा संघर्ष सुरूच आहे आपले पुर्ण आयूष्य पञकारा साठी वाहून घेतले असून राज्यात पञकारा वर कुठेही अन्याय झाला तर पहीला अवाज पञकाराच्या पाठीशी उभा राहतो तो एस एम सराचा हे सर्वांना माहीत आहे.
माझ्या सारख्या तालूक्याच्या ठिकाणच्या पञकाराला परीषदेच्या कार्यकारणी वर काम करण्याची संधी फक्त सरान मुळेच मिळू शकली माझ्या सारखे अनेक तरूण पञकार सरा मुळे परीषदेच्या प्रवाहात आले आहेत सरा वर प्रेम करणारे राज्याच्या काना कोपऱ्यातील पञकार मी पाहीले आहेत .सराच्या जवळ पास हि कोणी पोहचू शकत नाही.अशा आमचे मार्गदर्शक पञकाराचे सर्वसामन्य नेते मा.श्री एस एम देशमूख सराचा आज वाढदीवस या नेतृत्वास दिर्घआयूष्य लाभावे सरा चा लढ्यास ईश्वराने यश द्यावे हि प्रार्थना या नेतृत्वाच्या छञछायेत मला काम करण्याची संधी मिळाली मला खंबीर मार्गदर्शक मिळाला हे माझे भाग्य या माझ्या नेतृत्वास खुप खुप शुभेच्छा*
🙏 शुभेच्छूक🙏
अनिल महाजन (सरचिटणीस)
मराठी पञकार परीषद,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published.