Home » महाराष्ट्र माझा » शेतकऱ्यांना बँकांनीही प्राधान्य द्यावे!- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना बँकांनीही प्राधान्य द्यावे!- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना बँकांनीही प्राधान्य द्यावे!- मुख्यमंत्री.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
मुंबई : शेती आणि शेतकरी हा राज्य सरकारचा प्राधान्यक्रमाचा विषय आहे. तो बँकांचाही प्राधान्यक्रमाचा विषय व्हावा, बँकांनी शेती आणि पूरक क्षेत्रासाठी पतपुरवठय़ावर अधिक लक्ष द्यावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत व्यक्त केली आहे. या बैठकीत २०१८-१९च्या ५ लाख ७९ हजार ५३१ कोटी रुपयांच्या पतधोरणास मंजुरी देण्यात आली. त्यात कृषीक्षेत्रासाठी ८५ हजार ४६४ कोटी रुपयांचा समावेश असून मागील वर्षांच्या तुलनेत यात १०.७० टक्के वाढ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची १३९वी बैठक गुरुवारी झाली. बैठकीस मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान यांच्यासह राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह समिती सदस्य व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृषीक्षेत्रासाठी प्रस्तावित पतधोरणात पीक कर्जासाठी ५८ हजार ३१९ कोटी रुपये तर गुंतवणूक कर्जासाठी २७ हजार १४५ कोटी रुपयांचा समावेश आहे. पतपुरवठा आराखडा मोठा असणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच तो पूर्णत: अमलात आणणे महत्त्वाचे आणि आव्हानात्मक काम आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बँकांनी पतपुरवठय़ाचे उद्दिष्ट आणि साध्य यातील दरी सांधावी.

Leave a Reply

Your email address will not be published.