Home » माझा बीड जिल्हा » भिंत कोसळली, दोन वऱ्हाडी जागीच ठार.

भिंत कोसळली, दोन वऱ्हाडी जागीच ठार.

भिंत कोसळली, दोन वऱ्हाडी जागीच ठार.
डोंगरचा राजा आँनलाईन । बीड

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे लग्नप्रसंगी मंगल कार्यालयाची भिंत कोसळल्याने दोन वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहेत, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर विवाह सोहळ्यात एकच गोंधळ उडाला.

प्राथमिक माहितीनुसार, मादलमोही येथे युवराज लॉन्समध्ये रोमन-गिघे यांच्यामध्ये शुभविवाह सुरू होता. याच दरम्यान मंगल कार्यालयाची भिंत कोसळली. या भिंतीखाली दबून सुखदेव चव्हान आणि कालीनदा गायकवाड या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.