Home » माझी वडवणी » ना.मुंडे यांच्यामुळे बोंडअळीचे २५६ कोटी मंजूर.

ना.मुंडे यांच्यामुळे बोंडअळीचे २५६ कोटी मंजूर.

ना.मुंडे यांच्यामुळे बोंडअळीचे २५६ कोटी मंजूर
– पहिला हप्ता ८५ कोटीचा.
– पैकी ६८ कोटी रुपये खात्यात जमा.
बीड / डोंगरचा राजा आँनलाईन.
शेतक-यांना संकट काळात नेहमीच धावून जाणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी याही वेळी शेतक-यांना दिलासा दिला असून त्यांच्यामुळे जिल्हयातील कापूस उत्पादकांसाठी बोंडअळी नुकसानीचे २५६ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील पहिला हप्ता ८५ कोटी ५२ लाख रुपये असून त्यापैकी ६८ कोटी ४२ लाख रुपये शेतक-यांच्या खात्यातही जमा झाले आहेत.

सन २०१७ च्या खरीप हंगामात जिल्हयातील कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांवर आर्थिक संकट ओढवले होते.राज्यात सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात याचा फटका शेतक-यांना बसला होता, अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्याची भूमिका ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांनतर शासनाने कापूस उत्पादकांना मदत जाहीर केली. बीड जिल्हयातील ६ लाख ९२ हजार ३८ बाधित शेतक-यांना २५६ कोटी ५८ लाख ९३ हजार इतकी रक्कम त्यासाठी मंजूर झाली आहे. ही रक्कम शेतक-यांना समान तीन हप्त्यात वितरित करण्यात येणार आहे. यातील पहिला हप्ता ८५ कोटी ५२ लाख ९७ हजार ८९३ एवढा मंजूर झाला असून यापैकी ६८ कोटी ४२ लाख रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा देखील करण्यात आले आहेत.

*परळीला कमी पण* *जिल्हयातील*
*शेतक-यांचा विचार*
——————————–
परळी तालुका व अंबाजोगाई तालुक्याचा काही भाग असा ना. पंकजाताई मुंडे यांचा मतदारसंघ आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत या दोन्ही तालुक्यातील कापूस उत्पादकांना कमी नुकसान भरपाई मिळाली असली तरी ना. पंकजाताई मुंडे यांनी मदत करताना संपूर्ण जिल्हयातील शेतक-यांचा विचार केला. त्यांचे झालेले नुकसान लक्षात घेवून एवढी मोठी रक्कम त्यांनी मंजूर करून घेतल्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
——————–
*अतिवृष्टीचे पैसैही लवकरच*
———————————-
जिल्हयाच्या ऑक्टोबर २०१६ मध्ये अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे एक लाख ३२६ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले होते. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा करून जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईचा अहवाल ना. पंकजाताई मुंडे यांच्या सूचनेवरून शासनाकडे पाठवला होता. यातील नुकसान भरपाईचे ६८ कोटी १५ लाख रुपये लवकरच शेतक-यांना मंजूर होणार असून ना. पंकजाताई मुंडे यांचा त्यादृष्टीने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
—————-
बोंडअळी नुकसानीची मंजूर झालेली तालुकानिहाय रक्कम पुढीलप्रमाणे..कंसातील आकडे बीम्स प्रणालीद्वारे प्रत्यक्ष जमा झालेल्या रकमेचे आहेत. बीड – ५२ कोटी ५९ लाख ९३ हजार (१४ कोटी २ लाख ), गेवराई- ५० कोटी १७ हजार (१३ कोटी ३३ लाख ), शिरूर- १९ कोटी ८४ लाख (५ कोटी २९ लाख ), आष्टी- १८ कोटी ७६ लाख (५ कोटी ), पाटोदा – १४ कोटी ८८ लाख (३कोटी ९६ लाख), माजलगाव- २५ कोटी १८ लाख (६ कोटी ७१ लाख ), धारूर – १६ कोटी ८ लाख (४ कोटी २८ लाख ), वडवणी- १५ कोटी २ लाख (४ कोटी ), केज- २६ कोटी ६१ लाख (७ कोटी ९ लाख ), अंबाजोगाई- ५ कोटी १७ लाख (१ कोटी ३७लाख ), परळी- १२ कोटी ४० लाख (३ कोटी ३० लाख )
●●●●

Leave a Reply

Your email address will not be published.