Home » ब्रेकिंग न्यूज » ना.गडकरींनी खा.डाँ.मुंडेची मागणी पुर्ण केली.

ना.गडकरींनी खा.डाँ.मुंडेची मागणी पुर्ण केली.

ना.गडकरींनी खा.डाँ.मुंडेची मागणी पुर्ण केली.
मुंबई-बीड-लातूर नवा राष्ट्रीय महामार्ग मंजुर!
बीड / डोंगरचा राजा आँनलाईन
जिल्ह्यातुन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाची खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी 19 एप्रिल रोजी अंबाजोगाई येथे जाहीर मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. या महामार्गामुळे जामखेड-बीड-लातुर हा महामार्ग चौपदरी होणार असल्याने खासदार मुंडे यांची मागणी मान्य झाली आहे. मुंबईहुन बीड मार्गे लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे ते न्हावरा, तर दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी-जामखेड-बीड-केज ते लातूर असा मार्ग करण्यात येणार असून, एकूण ५५० किलोमीटरचा हा नवा ‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी’ नावाने ओळखला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. तळेगाव दाभाडेमार्गे बीड-लातूरला जाणाऱ्या महामार्गावर चाकणच्या आंबेठाण चौकातून भुयारी मार्ग, तर पुणे-नाशिक महामार्गावर उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. तसेच पुढे शिक्रापूर येथे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन या मार्गावर भुयारी, तर पुणे-अहमदनगर मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

जिल्ह्यातुन एकुण 800 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्गांचं काम सुरु असुन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाची खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी 19 एप्रिल रोजी अंबाजोगाई येथे जाहीर मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. या महामार्गामुळे जामखेड-बीड-लातुर हा महामार्ग चौपदरी होणार असल्याने खासदार मुंडे यांची मागणी मान्य झाली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.