Home » राजकारण » धसांच्या विजयासाठी ना.मुंडे,ना.पाटील यांच्या बैठका.

धसांच्या विजयासाठी ना.मुंडे,ना.पाटील यांच्या बैठका.

धसांच्या विजयासाठी ना.मुंडे,ना.पाटील यांच्या बैठका.
– बीडमध्येही घेतल्या मतदारांच्या भेटी.
लातुर / डोंगरचा राजा आँनलाईन
बीड- लातुर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीनिमित्त काल गुरूवारी लातुर येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे व लातुरचे पालकमंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर यांनी संयुक्तरित्या मतदारांसोबत मॅरॅथाॅन बैठका घेऊन जोरदार आघाडी घेतली आहे.

रमेश कराड यांच्या यु-टर्न मुळे धडकी भरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांची नाराजी दुर करुन त्यांना कसेबसे कामाला लावले आहे. एकीकडे पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांना वर्षभरापुर्वी दिलेला शब्द पाळला तर दुसरीकडे अशोक जगदाळेंना धनंजय मुंडे व राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींबद्दल उलटा अनुभव आल्याने त्यांची नाराजी पक्षाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी घातक ठरु शकेल.

*ना पंकजाताई मुंडे – संभाजी पाटलांची संयुक्त बैठक*
———————
सदरील निवडणुकीमध्ये भाजप महायुती सरस ठरत असल्याचे दिसत असून पंकजाताई मुंडे व संभाजी निलंगेकर यांनी या निवडणुकीसाठी पुर्ण ताकत लावली आहे. निवडणूकीच्या निमित्ताने ना. पंकजाताई मुंडे गेले दोन दिवस बीड व लातुरच्या दौ-यावर होत्या. बुधवारी त्यांनी बीड येथे पक्षाचे पदाधिकारी तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या तर काल गुरूवारी ना. पंकजाताई व संभाजी पाटील यांनी लातूर जिल्हयातील सर्व मतदारांची संयुक्त बैठक घेवून धस यांच्या विजयासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. आ. सुधाकर भालेराव, आ. विनायक पाटील, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, आ. संगीता ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शैलेश लाहोटी आदी यावेळी उपस्थित होते. संभाजी पाटील यांनी यावेळी बोलताना ही जागा भाजपच्या ताब्यात खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असा ठाम निर्धार व्यक्त केला.

भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचा विविध पक्षांमधील मित्र परिवार देखील या निवडणुकीसाठी सक्रीय झाला असुन रमेश कराडांनी दिलेल्या झटक्यातुन राष्ट्रवादी काॅग्रेस अशोक जगदाळेंसाठी अजूनही सावरली नसल्याचे दिसून येत आहे.
●●●●

Leave a Reply

Your email address will not be published.