टँकरची अॅपेरिक्षाला धडक,९ जागीच ठार.
– पैठण रोडवरील नक्षत्रवाडीजवळ अपघात
डोंगरचा राजा / आँनलाईन
औरंगाबादमध्ये भरधाव टँकरची अॅपे रिक्षाला धडक, ९ जण जागीच ठार
भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अॅपे रिक्षातील ९ प्रवासी ठार झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पैठण रोडजवळच्या नक्षत्रवाडी जवळ घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारोळा येथून पाण्याचा टँकर (क्रमांक एमएच १५ जी ८४०) भरधाव वेगाने औरंगाबादच्या दिशेने येत होता. नक्षत्रवाडी येथील हॉलीवुड ढाब्यापासून जवळच असलेल्या बंजारा हॉटेल समोरील वळणावर टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टँकरने समोरून येणाऱ्या दुचाकीला अगोदर धडक दिली, त्यानंतर अॅपे रिक्षाला (क्रमांक एमएच २० डीसी ४२६७) जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अॅपे रिक्षाचा पार चक्काचूर झाला.
अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याच्या टु-मोबाईलने तसेच संताजी पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून अॅपे मधील ठार झालेल्या प्रवााशांना १०८ च्या अॅम्बूलंन्सने तसेच रिक्षाने उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात हलवले.