Home » माझा बीड जिल्हा » आता मागेल त्याला दारू ? – अँड.देशमुख.

आता मागेल त्याला दारू ? – अँड.देशमुख.

आता मागेल त्याला दारू ? – अँड.देशमुख.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
दारू विकण्यासाठी जसा परवाना आवश्यक आहे, तसाच तो दारू पिण्यासाठी खरेदी करण्यासाठीही आवश्यक आहे. मात्र या नियमाला जिल्ह्यात हरताळ फासला जात आहे. यातून तरुणांना बिघडवणारी यंत्रणा सक्षम होत असून राज्य उत्पादन शुल्क खाते पूर्णतः झोपले असल्याचे स्पष्ट होत आहे. असाच प्रकार होत गेला तर देशाचे उद्याचे भवितव्य काय ? हा प्रश्न उपस्थित होतो. अधीक्षक कार्यालयाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
दारू पिण्यासाठी कायद्याने परवाना घ्यावा लागतो. दारू म्हणजे नशा आणणारा द्रव पदार्थ आहे. यातील अल्कोहलचे प्रमाण शरीरात हवे तेवढेच गेले पाहिजे. त्यामुळे परवाना घेण्यासाठी त्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणी करून दारू पिण्याची आवश्यक्ता असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यानंतरच उत्पादन शुल्क खाते त्या व्यक्तीने दररोज, विहित कालावधीत किती दारू प्यावी, याचा परवाना देते. त्या व्यक्तीने तेवढीच दारू खरेदी करावी आणि परवाना पाहूनच तेवढीच दारू दुकानदाराने विकावी या नियम आहे.
जिल्ह्यात मागेल त्याला दारू हे तत्व अवलंबिले जात आहे. जर असे होत गेले तर दारू पिणाऱ्यांवर कोणतेही बंधन रहाणार नाही. कुटुंबातील एक व्यक्ती दारूडी असेल तर पूर्ण कुटुंब वाया जाते. एका व्यक्तीचे परिणाम सर्वाना भोगावे लागते. जिह्यात व्यसनाधिनतेचे परिणाम वाढण्याची भीती अशा प्रकाराने वाढत आहे.
जिल्ह्यात वैध आणि अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात आहे. पोलिसांनीही अशा प्रकरणात आरोपीने जेलची कोठडी दाखविली पाहिजे. उत्पादन शुल्क खात्याने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. जाणीवपूर्वक चूक करणे, म्हणजे समाजाचा विचार न करणे आहे. एखाद्याच्या कुटुंबाची वाताहात लावण्याचं काम या खात्याच्या लोकांनी करू नये, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.