भारतीय सैनिकाचा सत्कार संपन्न.
डोंगरचा राजा/दिंद्रुड.
चोपनवाडी येथिल सोमनाथ वनवे हे भारतिय लष्करात सैनिक आहेत.विवाह सोहळ्यानिमिक्त सद्या आपल्या गावी सुट्टीवर आसुन काल दि 10 रोजी त्यांचा वाढदिवसानिमित्त दिंद्रुड येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष स्वामी, अतुल चव्हाण, अमोल ठोंबरे,शिरीष रामदासी,परशुराम लांडे यांनी सत्काराचे आयोजन केले होते.
सन 2016 पासुन भारतीय लष्करात बँगलोर येथे सोमनाथ वनवे कार्यरत आहेत नुकतीच त्यांची जम्मू ला बदली झाली असुन स्वत:च्या विवाह सोहळ्यानिमित्त ते गावी सुट्टीवर आहेत.वाढदिवसा निमित्त चोपनवाडीचे माजी सरपंच विक्रम वनवे गुरुजी,आसाराम कांदे यांनी शुभेच्छा देतांना सोमनाथने सैन्य दलात शामिल होण्यासाठी जि कष्ट घेतली आहेत ती नवयुवकांना प्रेरणादायक असल्याचे सांगितले.
चौकट
सैन्यदलात सोमनाथ वनवे यांना ड्रील मार्च मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे.स्वत:च्या लग्नात साध्या पेहरावात छातीवर गोल्ड मेडल लावुन त्यांनी अतिथींना देश सेवेची प्रचिती आणुन दाखवली