Home » महाराष्ट्र माझा » वैभवीची मराठवाडाच्या वैभवात भर.

वैभवीची मराठवाडाच्या वैभवात भर.

वैभवीची मराठवाडाच्या वैभवात भर.
– मराठवाडा गौरव पुरस्काराने सन्मान.
माजलगांव / रविकांत उघडे
औरंगाबाद येथील जी ग्रुप डान्स स्पोर्ट अँड कल्चरल अकॅडमी च्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठवाडा गौरव पुरस्काराने यावर्षी बालनृत्यांगना वैभवी टाकणखार हिला सन्मानित करण्यात आले आहे. वैभवी टाकणखार हिच्यासह साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध साहित्यिक रा र बोराडे, चित्रपट दिग्दर्शक डॉ सुधीर निकम व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल युवा क्रिकेटर विजय झोल यांना पुरस्कार देण्यात आले.
औरंगाबाद येथील जी ग्रुप डान्स स्पोर्ट ऍण्ड कल्चरल अकॅडमी च्या वतीने सांस्कृतिक, साहित्यिक, चित्रपट व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना मराठवाडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. माजलगाव येथील बाल नृत्यांगना वैभवी कैलास टाकणखार हिने मराठवाड्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविल्यायबद्दल तीला सन्मानाचा समजला जाणारा मराठवाडा गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. औरंगाबाद येथे आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शनिवारी आमदार संजय शिरसाठ, टी. श्यामसुंदर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
माजलगाव सारख्या ग्रामीण भागातील वैभवी कैलास टाकणखार हिने कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण नघेता अंगभूत कलेच्या जोरावर तसेच वडील कैलास टाकणखार व काका गोविंद टाकणखार यांच्या प्रेरणेतून नृत्य कलेत तालुका, जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय,,राष्ट्रीय पातळींवर, व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेऊन 308 पारितोषिक व 17पुरस्कार पटकावले आहेत. मलेशिया येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भरतनाट्यम सादर करुन द्वितीय पारितोषिक पटकाविले होते. बँकॉक व स्पेनया दोन्ही देशात तिची निवड झाली होती परंतु आर्थिक परिस्तिती बिकट असल्याने तिला आन्तर्राष्टीय स्पधेत सहभागी होता आले नाही. ई टी व्ही वरील अस्सल डान्सर व झी युवा मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स मध्येही सहभाग घेतला होता.
वैभवी टाकणखार हिला मराठवाडा गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.