Home » माझी वडवणी » संभाजी भिडेला अटक करा,रिपाई चे निदर्शने.

संभाजी भिडेला अटक करा,रिपाई चे निदर्शने.

संभाजी भिडेला अटक करा,रिपाई चे निदर्शने.
डोंगरचा राजा /आँनलाईन.
भिमा कोरेगाव येथील दंगलीत असणाऱ्या संभाजी भिडेला अटक करण्यात यावी.यासह आदी मागण्या संदर्भात वडवणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया ( आठवले गट ) च्या वतीने शहरातुन रँली काढत तहसिल कार्यालयावर तिवृ स्वरुपात निदर्शने करण्यात आली.
भिमा कोरेगाव येथील दंगलीत असणाऱ्या संभाजी भिडेला अटक करण्यात यावी.अँट्रासिटी कायद्याची कठोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, कसत असलेल्यांच्या नावे विना अट सर्वच जाचक अटी रद्द करुन गायरान जमीनी नावे करा,
ग्रामसभा,ग्रामपंचायतच्या घरकुलासाठी ठराव देण्याची अट रद्द करण्यात येऊन सरसगट घरकुले देण्यात यावीत,शहरी भागात देखील सर्वांना विना अट घरकुले उपलब्ध करुन द्यावीत ,विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येऊन विनाविलंब सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यात यावी,मागासवर्गियांच्या सर्वच महामंडळांना विनाविलंब निधी उपलब्ध करुन द्यावा.या प्रमुख मागण्या संदर्भात वडवणी रिपब्लीकन पार्टी आँफ इंडिया ( आठवले गट ) च्या वतीने युवा रिपाई चे प्रदेशाध्यक्ष तथा रिपाई जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या आदेशान्वये रिपाई तालुका अध्यक्ष महादेव उजगरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातुन रँली काढत तहसिल कार्यालयावर भव्य निदर्शने करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष महादेव उजगरे, बहुजन नेते समाधान शिनगारे यांच्यासह आदींनी आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्या. या भव्य निदर्शनात शहराध्यक्ष प्रकाश तांगडे , माजी सरपंच राजु वाघमारे , समाधान झोडगे, दिलीप आवचर, विष्णू पाटोळे, सचिन आवचर, महेंद्र गायकवाड , बंडु मुजमुले, आन्नासाहेब मुजमुले, नितिन मस्के ,जिवन डोंगरे , अनिल डोंगरे, भैय्यासाहेब डोंगरे, सुनिल डोँगरे, अविनाश डोंगरे, संतोष झोडगे,लक्ष्मण झोडगे, बिबिषण डोंगरे,शरद डोंगरे, अनिल डोंगरे,नितिन झोडगे ,जिजा डोंगरे, विक्रम काकडे, आबासाहेब जावळे, अनंत वाघमारे , संजय डोंगरे, रामा डोँगरे, सतेश डोंगरे, प्रकाश डोंगरे, सुधाकर डोंगरे, आदित्य डोंगरे, राजेभाऊ काकडे, सोनाजी उजगरे ,प्रसाद झोडगे ,आकाश वाघमारे , सदाशिव नरवडे, माँडी उजगरे , संघर्ष उजगरे ,किरण उजगरे ,नितीन उजगरे ,चंद्रकांत जावळे, अमोल झोडगे ,गणेश लोनके,सतिष डोंगरे, राम झोडगे , रामेश्वर वाघमारे सह आदींचा यात सहभाग होता. शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक, स्व.वसंतराव नाईक चौक, संविधान चौक, मेन रोड, छ.शिवाजी महाराज चौक, छ.संभाजी महाराज चौक मार्गे रँली तहसिल कार्यालयावर धडकली. यावेळी तहसिलदार खिल्लारे यांच्या कडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.वडवणी पोलिस स्टेशनचे पिएसआय भोसले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.