Home » राजकारण » शिवसेने सोबत युती न केल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल – चव्हाण.

शिवसेने सोबत युती न केल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल – चव्हाण.

शिवसेने सोबत युती न केल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल – चव्हाण.

डोंगरचा राजा / आँनलाईन.
शिवसेनेबरोबर युती न केल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मत.

शिवसेनेला भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा नाही. मात्र शिवसेने बरोबरची ही युती भाजपाची गरज आहे. सेनेबरोबर युती न झाल्यास भाजपाचे अस्तित्व संपेल, अशी भविष्यवाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी पंढरपूर येथे आले होते. येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, की देशात २०१४ च्या लोकसभेला भाजपा सह मित्र पक्षांना ३१ टक्के मते मिळाली होती. तर विरोधात ६९ टक्के मते होती. त्यामुळे आता विरोधक एक झाले आहेत. त्याचा परिणाम पोटनिवडणुकीत दिसला आहे. तर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा काढला नसता तर भाजपा सरकार आलेच नसते, अशी टीका राष्ट्रवादीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी केली .भाजपसोबत युती तोडण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेनेला भाजप सोडणार नाही. प्रसंगी, भाजपा साम, दाम, दंड ,भेद या नीतीचा वापर करेल असा गर्भित इशारा चव्हाण यांनी या वेळी दिला. साखरेच्या दरातील अस्थिरता लक्षात घेता उसाच्या एफआरपी धोरणाचा फेरविचार करावा लागेल असेही त्यांनी या वेळी सांगितले. विधानपरिषद निवडणुकीत आघाडी सर्व जागा जिंकेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.