Home » माझा बीड जिल्हा » वाढदिवसाचा खर्च टाळत श्रमदानासाठी अर्थसहाय्य.

वाढदिवसाचा खर्च टाळत श्रमदानासाठी अर्थसहाय्य.

वाढदिवसाचा खर्च टाळत श्रमदानासाठी अर्थसहाय्य.
दिंद्रुड / डोंगरचा राजा आँनलाईन
– शिक्षकाने आठ दिवसाचा पगार दिला भेट.
वाॅटर कप स्पर्धेतील गावात आता श्रमदानाचे तुफान बघायला मिळत आहे.विविध सामाजिक संस्था स्पर्धक गावांना भेटी देत तन मन व धनाचे सहाय्य करत असल्याचे ही दिसत असतांना धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक प्रदिप खाडे यांना या स्पर्धेतील व्हरकटवाडी या गावाला विशेष काहि तरी मदत द्यावी वाटत होती स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक सर्व मित्रांना घेऊन ते चक्क आज व्हरकटवाडी येथे उपस्थित होते. दोन तास सर्व मित्रांनी घाम गाळत श्रमदान केल्यानंतर प्रदिप खाडे यांनी त्यांच्या पगारातील आठ दिवसाची रक्कम व्हरकटवाडी ग्रामस्थांना भेट देऊन सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
27 दिवसात स्पर्धेचे ध्येयापर्यंत पोहंचलेल्या व्हरकटवाडी गावाने जवळपास सर्व कामे पुर्णत्वास नेली आहेत.
विजयाचे शिल्पकार रात्रंदिन स्पर्धा जिंकण्यासाठी श्रमदान करित आहेत.राम व्हरकटे या सुशिक्षित शिक्षकाच्या मार्गदर्शना खाली येथिल वाॅटर कप स्पर्धेचे प्रशिक्षणार्थी तातेराव केरबा व्हरकटे, सुदाम संभुदेव व्हरकटे, मधुकर हरीभाऊ उंडाळकर, मिरा बबन व्हरकटे, वेणुबाई रामेश्वर व्हरकटे,कमल गोवर्धन मदने यांच्या देखरेखीखाली शिस्तबद्ध स्वरुपात कामे केली आहेत.

खाडे यांच्या या उपक्रमात दिंद्रुड चे सामाजिक कार्यकर्ते अतुल चव्हाण, अमोल ठोंबरे,संतोष स्वामी, नितीन ठोंबरे,दिपक पवने, गोविंद खाडे यांनी श्रमदान करुन साथ दिली.सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावा पुढे वाढदिवस साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. निरर्थक खर्च करण्या पेक्षा विधायक कार्यास मदत केल्यास येणार्या कालावधीत सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बनण्यास वेळ लागणार नाही हे ही तितकेच सत्य आहे.सर्वसाधारण घरातील शिक्षक असणार्या प्रदिप खाडे यांचा आदर्श युवापिढीने घेणे अवश्यक आहे.

चौकट

वाॅटरकप स्पर्धेत धारुर तालुक्यातुन व्हरकटवाडी या गावाने दर्जेदार काम करत आपले गांव या स्पर्धेत जिंकायचेच या मनोवृत्तीने काम सुरु ठेवले आहे सोशल मिडिया वर या गावाच्या कामाचा आढावा घेतल्याने मी प्रभावित झालो व या व्हरकटवाडी गावा आपन ही काहितरी करावे या उद्देशाने आपण या गावाला हि मदत दिल्याचे शिक्षक प्रदिप खाडे सर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.