Home » देश-विदेश » …तर चीनला अमेरिकेचा इशारा.

…तर चीनला अमेरिकेचा इशारा.

…तर चीनला अमेरिकेचा इशारा.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
चीनने दक्षिण चीन सागरात मिसाईल सिस्टीम तैनात केल्याच्या वृत्ताची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. दक्षिण चीन सागरात चीन लष्करी सामर्थ्य वाढवत आहे त्याचे चीनला परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकेने म्हटले आहे. प्रेस सचिव साराह सँडर्स यांनी चीनच्या मिसाईल तैनातीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
नेमके काय परिणाम भोगावे लागतील ते सँडर्स यांनी स्पष्ट केले नाही. दक्षिण चीन सागरावरुन चीनचा शेजारी देशांबरोबर वाद सुरु आहे. संपूर्ण दक्षिण चीन सागरावर चीन आपला हक्क सांगत आहे. व्हिएतनामसह अनेक देशांबरोबर चीनचा वाद सुरु आहे. दक्षिण चीन सागरातील तीन तळांवर चीनने युद्धनौकांविरोधी क्रूज मिसाईल्स आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाईल सिस्टीम तैनात केली आहे.चीन या भागात कृत्रिम बेटांची उभारणी करत आहे. आम्ही आमच्या हद्दीत काहीही करु असे चीनचे म्हणणे आहे. दक्षिण चीन सागरातील लष्करी तळ हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुसज्ज करत आहोत. कुठल्याही देशाला लक्ष्य करण्याचा उद्देश नाही असे चीनचे म्हणणे आहे. जे देश आक्रमक नाहीयत त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही असे संरक्षण मंत्रालयाच्या महिला प्रवक्त्या हुआ च्युनयिंग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.